Take a fresh look at your lifestyle.

अर्ररर….भाजपाचं लोण काँग्रेसच्या दारात…काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा….वाचा कारण….

भाजपाकडून मुख्यमंत्र्याचा राजीनामा घेत राजकीय खांदेपालटीचा कार्यक्रम जोरात चालू असताना भाजपाच्या पंगतीला काँग्रेसही बसली आहे. काँग्रेस पक्षातील प्रबळ मुख्यमंत्री ओळख असलेल्या कॅप्टन अमरींदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

दिल्ली : देशास सध्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. भाजपाने कर्नाटक, उत्तराखंड पाठोपाठ गुजरातच्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा घेत नव्या हातात सत्तेच्या चाव्या दिल्या. त्यामुळे ऐन पावसाळ्यात देशातील राजकीय वातावरण चांगलेच गरम व्हायला लागले आहे. त्यातच आता भाजपाच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचं लोण काँग्रेसच्या दारात पोहचलं आहे.

Advertisement

भाजपाकडून मुख्यमंत्र्याचा राजीनामा घेत राजकीय खांदेपालटीचा कार्यक्रम जोरात चालू असताना भाजपाच्या पंगतीला काँग्रेसही बसली आहे. काँग्रेस पक्षातील प्रबळ मुख्यमंत्री ओळख असलेल्या कॅप्टन अमरींदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता गुजरातपाठोपाठ पंजाबमधील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. मुख्यमंत्री असलेल्या अमरींदर सिंग यांनी राजीनामा दिल्याने पंजाबमध्येही राजकीय भुकंप होणार का?अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह होता. त्यापार्श्वभुमीवर मुख्यमंत्री कॅप्टन अमरींदर सिंग यांनी दिलेला राजीनामा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. तर आता पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची माळ सुनील जाखड यांच्या गळ्यात पडण्यासाठी अनेकांनी पक्षाकडे मागणी केली आहे. तर नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठकी आज सुरू आहे. तर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अग्रस्थानी असलेल्या जाखड यांनी ट्वीट करत पंजाब काँग्रेसमधील वाद मिटवण्यासाठी राहूल गांधी यांनी अत्यंत धाडसी निर्णय घेतला त्यामुळे कार्यकर्ते उत्साहात आहेत, अशी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

Advertisement

Advertisement

Advertisement

पंजाबमधील राजकीय भुकंपाच्या पार्श्वभुमीवर पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत आणि केंद्रीय निरीक्षक अजय माकन आणि हरीश राय चौधरी चंदीगडला पोहचले आहेत. त्यामुळे पंजाबमधील राजकीय घडामोडींची चक्रे वेगाने फिरत आहेत. तर नवे मुख्यमंत्री कोण होणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. तर भाजपाने पंजाबमधील परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले आहे की, काँग्रेसचे जहाज बुडण्याच्या स्थितीत असून सध्या ते हेलकावेे खात आहे. त्यामुळे काँग्रेसची अवस्था दैयनिय झाली असल्याचे हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी म्हटले आहे.

Advertisement

गुजरातपाठोपाठ पंजाबमध्ये घडणाऱ्या घटनांवरून देशातील राजकीय स्थितीत मोठा बदल होईल का असा प्रश्न देशातील नागरीकांना पडत आहे. तर कॅप्टन अमरींदर सिंग आता काय निर्णय घेणार हे सुध्दा महत्वाचं ठरणार आहे.

Advertisement

CM Captain Amarinder Singhpanjab cmwhy panjab cm resignCongress Presidentsonia Gandhi

Advertisement
Advertisement

Leave a Reply