Take a fresh look at your lifestyle.

….म्हणून शरद पवारांनी व्यक्त केली खंत…वाचा काय म्हणाले पवार…

शरद पवारांना देशाच्या राजकारणात चाणक्य म्हणतात. तर त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपणच राजकारणातील चाणक्य असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र शरद पवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून खंत व्यक्त केली. 

मुंबई : देशाच्या राजकारणात शरद पवारांचे एक वेगळेच वजन आहे. कृषी, सहकार, साहित्य, क्रीडा यासारख्या महत्वाच्या विषयावर स्वपक्षीयांसोबतच विरोधी पक्षाचे नेतेही मार्गदर्शन घेत असतात. त्यामुळे शरद पवारांना देशाच्या राजकारणात चाणक्य म्हणतात. तर त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपणच राजकारणातील चाणक्य असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र शरद पवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून खंत व्यक्त केली.

Advertisement

सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र गेल्या दोन दिवसापुर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री म्हणू नका, येत्या दोन तीन दिवसात कळेल असे वक्तव्य केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही आजी, माजी आणि भावी सहकारी अशा प्रकारचं वक्तव्य औरंगाबाद येथील सभेत केले होते. त्यावरून संजय राऊत म्हणाले होते की, आम्ही समोरून कोथळा काढतो मागून खंजीर खुपसत नाही. तर खंजीर खुपसण्याची परंपरा आमची नाही, आम्ही समोरून वार करतो. मात्र समोरून वार केला तर कोथळा निघणार ना? अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. त्याचा अप्रत्यक्षपणे पवार यांनी समाचार घेतला.

Advertisement

केशव गोरे ट्रस्टतर्फे मृणालताई गोरे यांच्या दालनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई प्रमुख पाहुणे तर बाबा आढाव अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात अनेकांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्यापैकी सहज आठवण यावी अशा मृणालताई गोरे या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देतांना पवार म्हणाले, मृणालताई विरोधीपक्षनेत्या होत्या. अनेक मुद्द्यावर त्या सभागृहात बोलायच्या, शाब्दिक हल्ले करायच्या. मात्र सभागृहाच्या बाहेर तो संघर्ष विसरून सगळे एकत्र यायचे, राज्याच्या हिताच्या प्रश्नांवर चर्चा व्हायच्या, त्या ठिकाणी वाद नसायचा तर संवाद असायचा. त्यामुळे समजुतदारपणा तेव्हा सातत्याने पहायला मिळायचा, परस्परांबद्दल आस्था असायची. त्यामुळे तेव्हा कोथळा काढण्याची भाषा केली जात नव्हती. परंतू आता कोथळा काढण्याची भाषा केली जात आहे, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.

Advertisement
Advertisement

Leave a Reply