Take a fresh look at your lifestyle.

किसान क्रेडिट कार्डद्वारे पूरक व्यवसायासाठीही कर्ज मिळणार, शेतकऱ्यांचा कसा फायदा होणार वाचा..

नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या सर्व योजनांचा लाभ योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. केंद्रीय योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी, तसेच शेतकऱ्यांना पैशांची कमतरता जाणवू नये, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) दिले जाणार आहे. सर्व शेतकऱ्यांना केसीसी अंतर्गत आणण्यासाठी मोदी सरकार गेल्या वर्षापासून मोहीम राबवित असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले.

Advertisement

आता केसीसी फक्त शेतीपुरते मर्यादित न ठेवता, पशुसंवर्धन व मत्स्यपालन अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. किसान क्रेडिट कार्डद्वारे सरकार शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते. कर्जावरील व्याज 9 टक्के असले, तरी त्याला सरकारकडून 2% सबसिडी मिळते. यासह कर्जावर फक्त 7 टक्के व्याज भरावे लागते.

Advertisement

कोण घेऊ शकतो किसान क्रेडिट कार्ड?
शेती, मत्स्यपालन आणि पशुपालनाशी संबंधित कोणतीही व्यक्ती, जरी त्याने दुसऱ्याच्या जमिनीवर शेती केली, तरी त्याचा लाभ घेऊ शकतो. किमान वय 18 वर्षे, तर कमाल 75 वर्षे असावे. शेतकऱ्याचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर सह-अर्जदार देखील आवश्यक असेल. ज्यांचे वय 60 पेक्षा कमी आहे. शेतकऱ्याचा फॉर्म भरल्यानंतर बँक कर्मचारी तुम्ही पात्र आहात की नाही हे पाहतील.

Advertisement

कसे मिळणार केसीसी..?
आता केसीसी मिळविणे सोपे झाले आहे. त्यासाठी आधी https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर जा. तेथे किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाऊनलोड करा. हा फॉर्म जमिनीची कागदपत्रे, पीक तपशीलांसह भरावा लागेल. इतर कोणत्याही बँक किंवा शाखेतून इतर कोणतेही किसान क्रेडिट कार्ड बनवले नसल्याचे सांगावे लागेल. त्यानंतर अर्ज भरुन सबमिट करा, नंतर तुम्हाला संबंधित बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड मिळेल.

Advertisement

आवश्यक कागदपत्रे

Advertisement

मतदार ओळखपत्र / पॅन कार्ड / पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मतदार ओळखपत्र / पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स हे अॅड्रेस प्रूफ म्हणून पाहिले जाते.

Advertisement

सोशल मीडियातून नितीन गडकरींची भरगच्च कमाई, दर महिन्याला किती कमावतात पाहा..?
ऑनलाईन अन्न मागविणे महागणार..! जीएसटी बैठकीत काय ठरले, काय स्वस्त-काय महाग होणार..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply