Take a fresh look at your lifestyle.

कोरोना पाठोपाठ ‘त्या’ आजाराचे ‘या’ चार राज्यांत थैमान; राज्यांतील परिस्थिती होतेय गंभीर..

नवी दिल्ली : कोरोना देशात येऊन आता दोन वर्षे होत आहेत. तरीही या घातक आजाराचा मुक्काम अजून कायम आहे. आता तर तिसऱ्या लाटेचा धोका वाढला आहे. आधीच या आजाराने मोठे नुकसान केले आहे. या संकटाचा सामना करत असतानाच देशात दुसऱ्या घातक आजारांनी एन्ट्री घेतली आहे. या आजारांनी काही राज्ये हैराण झाली आहेत. कोरोनाचा सामना करतानाच आता या नव्या आजारांनी आव्हान उभे केले आहे.

Advertisement

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला असला तरी अद्याप धोका कायम आहे. कारण, काही राज्यात रुग्णांची संख्या जास्त आहे. आता तर सणासुदीचा काळ आहे. तसेच तिसऱ्या लाटेचाही धोका आहे. या संकटात नव्या संकटाची भर पडली आहे. काही राज्यात नव्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे दवाखाने पुन्हा रुग्णांनी भरले आहे. आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. प्रशासनास कोरोना प्रमाणेच या आजारांवरही लक्ष द्यावे लागत आहे. देशातील उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या राज्यांना डेंग्यू आणि व्हायरल फिवर या आजारांनी विळख्यात घेतले आहे. तर बिहार राज्यातही व्हायरल फिवरचे रुग्ण वाढत आहेत.

Advertisement

डेंग्यूचा सर्वाधिक फटका उत्तर प्रदेश राज्यास बसला आहे. या आजारामुळे फिरोजाबाद जिल्ह्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात डेंग्यू आणि व्हायरल फिवर या आजारांचे 1500 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. मध्य उत्तर प्रदेश, बुंदेलखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील जिल्ह्यात या आजाराचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे.

Advertisement

पश्चिम बंगाल राज्यातील दोन दवाखान्यात ताप आणि अन्य आजारांमुळे 172 मुलांना दाखल करण्यात आले. त्यानंतर मध्य प्रदेश राज्यातही डेंग्यूचा त्रास वाढला आहे. मागील 24 तासात नवे 22 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या 225 झाली आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply