Take a fresh look at your lifestyle.

सोने-चांदी बाजारभाव : आज पुन्हा सोने आणि चांदीचे भाव पडले; पहा, सध्या किती आहे सोन्याचा भाव

मुंबई : सोने चांदीच्या दरात काल वाढ झाली होती. त्यानंतर आज मात्र पुन्हा सोन्याचे दर घसरले आहेत. सतत होणाऱ्या या दर कपातीमुळे आता सोने 46 हजारांच्याही आत आले आहे. शनिवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे 45 हजार 780 रुपयांवरुन 45 हजार 390 रुपये प्रति दहा ग्रॅम असे दर झाले आहेत. चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. एक किलो चांदी सध्या 61 हजार 600 रुपये दराने मिळत आहे.

Advertisement

देशात सध्याच्या परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत आहेत. कधी कमी तर कधी जास्त असा ट्रेंड सुरू आहे. यामुळे सोन्याचे दर बरेच कमी झाले आहेत. एक वेळी असे वाटत होते की सोने 50 हजारांच्या पुढे जाईल. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोने 56 हजारांच्याही पुढे गेले होते. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे यावेळी सुद्धा सोने 50 हजरांच्या पुढे जाईल असे वाटत होते. त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला. राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे.

Advertisement

गुडरिटर्न्स वेबसाइटनुसार, आज नवी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 45,550 रुपये प्रति तोळा आहे. तर मुंबईमध्ये 22 कॅरेटचा दर 45,390 रुपये प्रति तोळा आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 43,710 रुपये प्रति तोळा आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरातही आज घसरण पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 46,780 रुपये प्रति तोळा होता. आज या शुद्धतेच्या सोन्याचा दर 46,390 रुपये प्रति तोळा आहे.

Advertisement

दरम्यान, आता सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे सोन्यास मागणी वाढण्याची शक्यता आहे. साधारण ऑक्टोबर महिन्यात मागणीत वाढ होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. असे घडले तर सोन्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply