Take a fresh look at your lifestyle.

अमेरीकी राष्ट्राध्यक्ष चक्क दहशतवाद्यांच्या वेशात…वाचा नेमकं काय आहे प्रकरण…

अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनी अफगाणीस्तानमधून सैन्य माघारीची घोषणा केली होती. तर ऑगस्टपर्यंत अमेरीकेने आपले सैन्य अफगाणीस्तानातून माघारी घेत अफगाणीस्तानची सत्ता अप्रत्यक्षरित्या तालिबान्यांच्या हाती सुपुर्द केली.

वॉशिंग्टन : अमेरीकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर अमेरीकेने दहशतवाद्यांच्या विरोधात जोरदार मोर्चा उघडला होता. दहशतवाद्यांना ठेचत अमेरीकेने अफगाणीस्तानमध्ये सैन्य पाठवले होते. अमेरीका दहशतवाद्यांना मोठ्या प्रमाणात विरोध करत आहे. मात्र या परिस्थितीत सध्या चक्क अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडन हेच दहशतवाद्यांच्या वेशात दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Advertisement

अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनी अफगाणीस्तानमधून सैन्य माघारीची घोषणा केली होती. तर ऑगस्टपर्यंत अमेरीकेने आपले सैन्य अफगाणीस्तानातून माघारी घेत अफगाणीस्तानची सत्ता अप्रत्यक्षरित्या तालिबान्यांच्या हाती सुपुर्द केली. त्यानंतर मुजोर तालिबान्यांनी अफगाणीस्तानात नंगानाच सुरू केला. लोकांना वेठीस धरून अत्याचार सुरू केले. त्यामुळे अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यावर जगभरातून जोरदार टीका होत आहे. तर अमेरीकेच्या नागरीकांनीही बिडेन यांच्या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला होता. कारण बिडेन यांच्या निर्णयामुळे अमेरीकेची जगभर नाचक्की झाल्याची भावना अमेरीकन नागरीकांमध्ये आहे.

Advertisement

माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, पेनसिल्व्हेनियाचे माजी सिनेटर स्कॉट वॅग्नर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या विरोधात महामार्गावर एक डझनहून अधिक होर्डिंग भाड्याने घेऊन होर्डिंग लावले आहेत. तर त्यासाठी स्कॉट यांनी 15 हजार डॉलर खर्च केले आहेत.

Advertisement

वॅग्नर यांनी द यॉर्क डेलीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, बिडेन यांच्या निर्णयामुळे संपुर्ण अमेरीकेला लाजिरवाणे व्हावे लागले आहे. त्याबरोबरच ही माघार व्हिएतनामपेक्षा वाईट आहे. त्यामुळे जे सैनिक अफगाणीस्तानमध्ये लढले त्यांना तुम्ही काय उत्तर देणार असा प्रश्नही स्कॉट यांनी विचारला. तर पुढे बोलताना स्कॉट म्हणाले की, मी काही ट्रम्प समर्थक नाही. परंतू ट्रम्प यांनीही जर हा निर्णय घेतला असता तरी मी त्याचाही विरोध केला असता. मात्र बिडेन यांनी सैन्य माघारीचा निर्णय घेऊ नये यासाठी अमेरीकेतून प्रचंड दबाव होता. पण त्यांनी कोणाचेही ऐकले नाही.

Advertisement

Advertisement

त्यामुळे स्कॉट वॅग्नर यांनी अमेरीकेची मान शरमेने खाली गेल्याबद्दल अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचे दहशतवाद्यांच्या वेशातील पोस्टर लावले आहे. त्यात बिडेन यांच्या हातात मोर्टार आहे, तर त्या पोस्टरवर मेकिंग द तालिबान ग्रेट अगेन असे लिहीले आहे. कारण अमेरीकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निवडणूक प्रचाराचे घोषवाक्य होते, मेकिंग अमेरीका ग्रेट अगेन. त्यावरून स्कॉट वॅग्नर यांनी बिडेन यांच्यावर टीका करत पोस्टर लावले आहेत. ते पोस्टर फक्त अमेरीकेतच नाही तर जगभर चर्चेचा विषय ठरत आहेत.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply