Take a fresh look at your lifestyle.

मोदकाची किंमत वाचून व्हाल थक्क…वाचा किती आहे मोदकांची किंमत….

गणपतीला प्रसन्न करून घेण्यासाठी भक्त दहा दिवस गणपतीला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक नैवद्य म्हणून ठेवत असतात. अशाच प्रकारच्या नैवद्याची किंमत ऐकून सर्वसामान्य माणूस चक्रावून गेल्याशिवाय राहणार नाही. 

नाशिक : महाराष्ट्रात गणेशोत्सवाला विशेष महत्व आहे. राज्यात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. तर राज्यात हा सण खास मानला जातो. त्यामुळे भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला श्री गणेशाची मुर्ती स्थापली जाते. तर अनंत चतुर्दशीला श्री गणेशाचे विसर्जन केले जाते. त्यामुळे गणपतीला प्रसन्न करून घेण्यासाठी भक्त दहा दिवस गणपतीला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक नैवद्य म्हणून ठेवत असतात. अशाच प्रकारच्या नैवद्याची किंमत ऐकून सर्वसामान्य माणूस चक्रावून गेल्याशिवाय राहणार नाही.

Advertisement

गणपतीच्या प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर गणपतीचा आवडता मोदक बनवण्यासाठी सर्व भक्तांची गडबड सुरू असते. कारण चांगल्या प्रकारचा मोदक नैवद्य म्हणून बाप्पाला ठेवून बाप्पाला प्रसन्न करून घ्यायचं असतं. त्यामुळे खास प्रकारचा मोदक बनवण्यासाठी भक्तगण वेगवेगळे प्रयत्न करत असतात. तर गणपतीला मोदक बनवून बाप्पाला मोदक अर्पण करून प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतात.

Advertisement

गणपतीला नैवद्य ठेवण्यासाठी मोदक नाममात्र किंमतीत खरेदी केले जातात. मोदकांची अगदी किंमत 100-200 रूपये किलोंच्या आसपास असते. मात्र नाशिक येथील एका मिठाईच्या दुकानात 12 हजार रूपये किलो किंमतीचे सोनेरी मोदक मिळत आहेत. तर हे मोदक नाशिक शहरासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे नाशिक येथील सागर स्वीट्स या दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती एएनआयने दिली आहे. तर या मोदकांचा विषय राज्यभर चर्चेचा ठरत आहे.

Advertisement

Advertisement

सागर स्वीट्सचे दीपक चौधरी यांनी एएनआयला सांगितले की, दुकानात सोनेरी, चांदी आणि काजू असे अनेक प्रकारचे मोदक आहेत. तर दुकानातील सर्वात महाग मोदक 12 हजार रूपये किलो आहेत. तर हे मोदक पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी नागरीक मोठी गर्दी करत आहेत. याबरोबरच चौधरी यांनी सांगितले की, आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असून दुकानात 25 प्रकारचे मोदक विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. तर या मोदकांची चांगली विक्री होत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply