Take a fresh look at your lifestyle.

सोशल मीडियातून नितीन गडकरींची भरगच्च कमाई, दर महिन्याला किती कमावतात पाहा..?

नवी दिल्ली : देशातील रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात केल्याने केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना रोडकरी म्हटले जाते. आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ते साऱ्या देशाला परिचित आहेत. विरोधकांसह ते आपल्या पक्षातील नेत्यांचे कान टोचायलाही मागे-पुढे पाहत नाहीत. तसेच त्यांनी अनेकदा भाषणादरम्यान अगदी सर्वांसमोर अधिकाऱ्यांचीही बिनपाण्याने धुलाई केली आहे.

Advertisement

दरम्यान, गडकरी यांच्या भाषणांना मोठा रसिक वर्ग आहे. सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात त्यांची भाषणे पाहिली जातात आणि त्यापोटी यू-ट्यूबकडून त्यांची भरगच्च कमाईदेखील होत असल्याची माहिती स्वत: गडकरी यांनीच दिली.

Advertisement

ते म्हणाले, की प्रत्येक महिन्याला यू-ट्यूबकडून त्यांना 4 लाख रुपये मिळतात. यु-ट्यूबवर त्यांच्या भाषणाचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. त्यामुळे त्यांना महिन्याला 4 लाख रुपयांची रॉयल्टी मिळते.

Advertisement

कोरोना काळात तर त्यांची भाषण खूप जणांनी पाहिली. त्यामुळे वाचक वर्ग वाढला. परिणामी, यू-ट्यूबकडून येणारे पैसेदेखील वाढले होते. गुजरातमधील भरूचमध्ये दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेच्या कामाची समीक्षा करीत असताना गडकरी यांनी याबाबत माहिती दिली.

Advertisement

कोरोना संसर्गादरम्यान लॉकडाऊनमध्ये वेळ कसा घालविला, याचीही माहिती गडकरी यांनी दिली. ते म्हणाले, की या काळात मी शेफ झालो होतो. घरात स्वयंपाक करीत होतो. शिवाय व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लेक्चर देत होतो. या काळात मी तब्बल 950 लेक्चर्स दिले. त्यातील अनेक लेक्चर्स परदेशातील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसमोर दिली आहेत.

Advertisement

गडकरी म्हणाले, की आम्ही यूट्यूबवर हे व्हिडीओ अपलोड केले. त्याचा वाचकवर्ग जलद गतीने वाढत आहे. युट्यूबने तर मला दर महिन्याला 4 लाखांची रॉयल्टी देणं सुरू केलंय.

Advertisement

चक्क राऊतांनी केली मोदींची स्तुती….वाचा काय म्हणाले संजय राऊत…
मोदकाची किंमत वाचून व्हाल थक्क…वाचा किती आहे मोदकांची किंमत….

Advertisement
Advertisement

Leave a Reply