Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो..!भाजपाने सगळं मंत्रीमंडळचं घरी बसवलं…वाचा नेमकं कारण…

गुजरातला भाजपा आधीपासुनच राजकारणाची प्रयोगशाळा मानत आला आहे. गुजरातमध्ये केलेल्या प्रयोगाच्या यशस्वीतेवर भाजपा त्याप्रकारचा प्रयोग देशभर करत असतो. गुजरातमध्ये पारंपरिक राजकारण सोडून नवी रिस्क घेतली जाते.

दिल्ली : 2014 साली केंद्रात भाजपा सरकार आल्यापासून देशात कधीही न घडलेल्या घटना घडत आहेत. अचानक ऑपरेशन लोटस च्या माध्यमातून विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यात पक्षांतर घडवून आणून भाजपा सत्ता ताब्यात घेत आहे. तर आतापर्यंत सत्ता बदलल्यानंतरच मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ बदललं जायचं. मात्र आता सत्ता असतानाही मुख्यमंत्रीच नाही तर संपुर्ण मंत्रीमंडळ घरी बसवल्याचा अनोखा प्रकार भाजपाने केला आहे.

Advertisement

गुजरातला भाजपा आधीपासुनच राजकारणाची प्रयोगशाळा मानत आला आहे. गुजरातमध्ये केलेल्या प्रयोगाच्या यशस्वीतेवर भाजपा त्याप्रकारचा प्रयोग देशभर करत असतो. गुजरातमध्ये पारंपरिक राजकारण सोडून नवी रिस्क घेतली जाते. त्याप्रमाणेच  2017 मध्ये गुजरात महानगरपालिका निवडणूकीत नो रिपीटचा फॉर्म्युला वापरत तगडी लढत देणाऱ्या काँग्रेसचा सुफडा साफ केला होता. आता तोच फॉर्म्युला आता भाजपाने गुजरात विधानसभा निवडणूकीच्या आधी वापरला आहे.

Advertisement

भारतीय राजकारणात कधीही न घडलेली गोष्ट भाजपाने गुजरातच्या मैदानात घडवली आहे. तर पुढील वर्षीची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजपाने गुजरातमध्ये अनोखा प्रयोग केला आहे. यामध्ये फक्त मुख्यमंत्री बदलच नाही तर संपुर्ण मंत्रीमंडळच घरी बसवल्याची घटना घडली आहे. त्यामुळे गुजरात भाजपाच्या नव्या मंत्रीमंडळात (Gujrat Cabinet) सर्वच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यात माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी (Former Chief Minister Vijay Rupani) यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपाने त्यांच्या जागी भुपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली. मात्र भुपेंद्र पटेल यांच्या नव्या मंत्रीमंडळात सगळ्या जुन्या मंत्र्यांना डावलून नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे. यामध्ये रूपाणी मंत्रीमंडळातील उपमुख्यमंत्री असलेल्या नितीन पटेल यांनाही घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. भाजपाने फक्त मंत्रीमंडळच नाही विधानसभेच्या अध्यक्षांचीही उचलबांगडी केली आहे.

Advertisement

गुजरातमध्ये जातीय समीकरण साधण्याचा भाजपाने प्रयत्न केला आहे. त्यामध्ये विविध जातींचे असलेले मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी भाजपाने मंत्रीमंडळात दुर्गम भागातील प्रतिनिधींना सहभागी करून घेतले आहे. तर या नव्या मंत्रीमंडळात भुपेंद्र पटेल यांच्यासह 24 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यामध्ये 10 कॅबिनेट तर 14 राज्यमंत्र्यांची निवड केली आहे. तर नव्या मंत्रीमंडळात रूपाणी यांच्या काळात विधानसभाध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांच्या जागी निमा आचार्य यांना शपथ दिली तर राजेंद्र त्रिवेदींना मंत्रीपदाची शपथ दिली. त्यामुळे भाजपाने केलेला हा प्रयोग गुजरात विधानसभेत फायद्याचा ठरणार की तोट्याचा हे येणाऱ्या काळातच समजेल. (Gujarat the entire cabinet Chief Minister and the Speaker of the Legislative Assembly has changed Deputy Chief Minister Nitin Patel also has no place. )

Advertisement
Advertisement

Leave a Reply