Take a fresh look at your lifestyle.

अखेर ज्याचा अंदाज होता ते घडले..! ‘त्या’ मुद्द्यावर राज्यांनी केलाय विरोध; पहा, आता केंद्र सरकार काय निर्णय घेणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या जीएसटी परिषदेची महत्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार सुरू आहे. बैठकीत या मुद्द्यावर चर्चा होईल. जर राज्यांनी सकारात्मक धोरण स्वीकारले तर हा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा होती. मात्र, राज्ये यास तयार होणार नाहीत, विरोध करतील असा दुसरा अंदाज होता. आता हा अंदाज खरा ठरत असल्याचे दिसून येत आहे. कारण, इंधनास जीएसटीच्या कक्षेत आणण्यास भाजपशासित उत्तर प्रदेशच्या अर्थमंत्र्यांसह बैठकीत सहभागी अन्य सहा राज्यांचे अर्थमंत्री सहमत नाहीत, अशी माहिती आहे.

Advertisement

त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलला जीएसटी कक्षेत आणण्याचा प्रस्ताव बैठकीत सादर केला तरी हा प्रस्ताव नाकारला जाण्याचीच शक्यता जास्त आहे. या बैठकीत सात राज्यांचे उपमुख्यमंत्री सुद्धा सहभागी झाले आहेत. केंद्र सरकारने एक देश एक किंमत या धोरणानुसार पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू आणि एविएशन टर्बाइन फ्यूल (विमान इंधन) या इंधनास जीएसटी अंतर्गत आणण्याचा विचार केला होता.

Advertisement

या मुद्द्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र बहुतांश राज्यांनी पेट्रोलियम पदार्थांना जीएसटी कक्षेत आणण्यास विरोध केला. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, झारखंड, छत्तीसगड, केरळ सह अन्य राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलला जीएसटी बाहेर ठेवण्यास सांगितले. त्यामुळे आता हा प्रस्ताव नाकारला जाण्याचीच जास्त शक्यता दिसत आहे.

Advertisement

पेट्रोल आणि डिझेल जर जीएसटीच्या कक्षेत आणले तर देशभरात पेट्रोलच्या किमती 25 ते 28 रुपयांनी कमी होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, राज्ये यास विरोध करत आहेत. कारण, या माध्यमातून राज्यांना मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. याच कारणामुळे पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणण्यास राज्ये विरोध करत आहेत.

Advertisement

राज्यांचा विरोध असल्याने केंद्र सरकार सुद्धा हा प्रस्ताव नाकारू शकते.  असे घडले तर इंधनाच्या किंमती कमी करण्याचा हा एक मार्ग बंद होणार आहे. अन्य मार्गांचा विचार करुन इंधनाचे दर कमी करण्यासाठी निर्णय घ्यावे लागतील, असे आता स्पष्ट होत आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply