Take a fresh look at your lifestyle.

परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपुर्ण निर्णय…वाचा कशी होणार परीक्षा….

रोना महामारीमुळे देशात शिक्षणव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ऑनलाईन शिक्षणाला विद्यार्थी कंटाळले आहेत. तर शाळा सुरू होण्यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढत आहे.

दिल्ली : कोरोना महामारीमुळे देशात शिक्षणव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ऑनलाईन शिक्षणाला विद्यार्थी कंटाळले आहेत. तर शाळा सुरू होण्यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढत आहे. तर मंदावलेली कोरोना रूग्णसंख्या पुन्हा वाढायला लागली आहे. त्यामुळे आधीच आरोग्य व्यवस्थेवर ताण असतानाच आता देशासाठी दिशादर्शक असलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Advertisement

देशभर ऑनलाईन की ऑफलाईन परीक्षा घ्यायच्या यावरून वादंग निर्माण झालं असतानाच सध्या सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असल्याने परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या याचिकेवर हस्तक्षेप केला होता. तर आता लगेचच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने 11 वी च्या ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी परवानगी दिली आहे.

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने केरळ सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देतांना म्हटले की, आम्हाला आशा आणि विश्वास आहे की केरळ सरकारद्वारा सर्व खबरदारीचे आणि आवश्यक असलेले पाऊले उचलली जातील. तसेच शालेय विद्यार्थ्यांना कोणत्याही गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे केरळ सरकारकडून सर्व काळजी घेतली जाईल, असा विश्वास व्यक्त करत केरळमध्ये 11 वीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यासाठी परवानगी दिली.

Advertisement

सध्या केरळमध्ये कोरोना रूग्णांची संख्या 22 हजार 182 इतकी नोंदली गेली तर 24 तासात 178 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे इतक्या रूग्णांची वाढ होत असताना सर्वोच्च न्यायालयाने केरळ सरकारवर दाखवलेला विश्वास वाखाणण्याजोगा आहे. त्यामुळे कोरोना महामारीपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करत परीक्षा घेणे केरळ सरकारसमोर मोठे आव्हान असणार आहे.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply