Take a fresh look at your lifestyle.

लग्न करायचंय….तर वाचा…लग्नाबाबत काय म्हणालंय उच्च न्यायालय…

उत्तरप्रदेशातील शिफा हसन आणि तिचा जोडीदार या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. मात्र त्या दोघांचा धर्म वेगळा आहे. परंतू ते दोघेही एकमेकांच्या संमतीने एकत्र राहतात.

दिल्ली- लग्न म्हणजे दोन जीवांच, दोन घरांचे मीलन आहे असं म्हटलं जातं. तर लग्नाला आपल्या संस्कृतीत विशेष महत्व आहे. मात्र आता लग्नाबाबत उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे.

Advertisement

उत्तरप्रदेशातील शिफा हसन आणि तिचा जोडीदार या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. मात्र त्या दोघांचा धर्म वेगळा आहे. परंतू ते दोघेही एकमेकांच्या संमतीने एकत्र राहतात. तर हसनने याचिकेत म्हटले आहे की, तिने मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्मात धर्मांतरासाठी अर्जही केला आहे. तर यानंतर संबंधीत जिल्हा दंडाधिकाऱ्याने पोलिस ठाण्याकडून अहवाल मागवला होता. तर यावेळी हसन यांनी याचिकेत म्हटले आहे की, तिचे वडील लग्नासाठी तयार आहेत. मात्र त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत उच्च न्यायालयाने महत्वपुर्ण निर्णय दिला आहे.

Advertisement

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती मनोज कुमार गुप्ता आणि दीपक वर्मा यांच्या खंडपीठाने शिफा हसन आणि तिच्या जोडीदाराला संरक्षण देतांना म्हटले आहे की, त्यांच्या पालकांनाही प्रौढांच्या नातेसंबंधांवर आक्षेप घेता येणार नाही. तर दोन प्रौढांना त्यांचा जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. मग ते दोघे कितीही धार्मिक प्रवृत्तीचे असले तरीही. तर न्यायालय पुढे म्हणाले की, त्यांच्या नातेसंबंधावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही. अगदी त्यांचे पालकही.

Advertisement

अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणात हसन आणि तिच्या जोडीदाराला संरक्षण देतांना म्हटले की, दोन प्रौढ व्यक्तींना आपला जोडीदार निवडण्याचा पुर्ण अधिकार आहे. तसेच ते कोणत्याही धर्माचे असले तरीही ते आपल्या मर्जीने आपला जोडीदार निवडू शकतात. त्यांच्या लग्नामध्ये कोणत्याही धार्मिक प्रवृत्ती आडकाठी आणू शकत नाहीत.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply