Take a fresh look at your lifestyle.

पीएफमधून अडव्हाॅन्स रक्कम काढणे कितपत योग्य, जाणकार काय म्हणतात, वाचा..

नवी दिल्ली : कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आल्याने दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम झाला. सर्वच क्षेत्रांना फटका बसला. अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. काही कंपन्यांनी पगारकपात केली. त्यात नेहमीच्या खर्चात रुग्णायलाच्या खर्चाची भर पडली. इन्कम कमी होत असताना, खर्चात मात्र मोठी वाढ झाली.

Advertisement

नागरिकांची होणारी आर्थिक कोंडी दूर करण्यासाठी `ईपीएफओ`नं पीएफ अकाउंटमधून (PF Account) पैसे काढण्याच्या नियमांत काही बदल केले. त्यानुसार, आता पीएफ खातेधारकांना पीएफ अॅडव्हान्स काढण्याचा पर्याय दिला आहे. अडचणीच्या काळात या खात्यातून नागरिकांना सहज पैसे काढता यावेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

Advertisement

कोरोनामुळे आर्थिक अडचणींत आलेल्या कर्मचाऱ्यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. ही सुविधा नेमकी काय आहे, पीएफ अकाउंटमधून किती रक्कम अॅडव्हान्स म्हणून काढता येते, अशी रक्कम काढणं कितपत योग्य आहे, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

पीएफधारक काही विशिष्ट कारणांसाठी यापूर्वीही पीएफ अकाउंटमधून काही प्रमाणात रक्कम काढू शकत होते. मात्र, त्यावेळी ही सगळी प्रक्रिया होण्यासाठी बराच कालावधी लागत होता. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना तातडीनं आर्थिक मदत मिळावी, यासाठी `ईपीएफओ`नं पीएफ अॅडव्हान्स काढण्याचे नियम बदलल्याने अशी स्थिती राहिलेली नाही.

Advertisement

असा पीएफ काढणे कितपत योग्य आहे, याबाबत जाणकारांनी माहिती दिलीय. त्यानुसार, पैशांची फारच गरज असेल, तरच तुम्ही पीएफ काढण्याचा निर्णय घ्यावा. मात्र, हे पैसे काढून तुम्ही अन्यत्र गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल, तर अशी गुंतवणूक चुकीची ठरू शकते. एकदा पीएफ अकाउंटमधून पैसे काढले, तर निवृत्तीच्या कालावधीपर्यंत तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं.

Advertisement

`ईपीएफओ`च्या निर्णयानुसार, पैशांची गरज असल्यास पीएफमधून 3 महिन्यांच्या वेतनाइतकी रक्कम काढू शकतात. हे पैसे परत करण्याचीही गरज नाही. या नियमांतर्गत खातेधारकाला तीन महिन्यांचं मूळ वेतन आणि महागाई भत्ता किंवा खात्यात जमा रकमेच्या 75 टक्के रक्कम यांपैकी जी कमी असेल, ती रक्कम काढण्याची परवानगी दिली होती.

Advertisement

विशेष म्हणजे, अॅडव्हान्सची ही रक्कम काही दिवसांत पुन्हा खात्यात जमा केली जाणार होती. सर्वप्रथम कोरोनाशी निगडित केसेसचा निपटारा केला जातो आणि त्यानंतर सामान्य प्रक्रियेंतर्गत करण्यात आलेल्या क्लेमची रक्कम जमा केली जात असल्याची माहिती `ईपीएफओ`कडून देण्यात आली.

Advertisement

शेतकऱ्यांना करावी लागणार ई-पिक पाहणीची नोंद, कशी करणार, मग वाचा की..
अर्र… मोफत धान्य वितरण बंद तरीही मिळणार मोफत धान्य; पहा, कोणत्या राज्यात घडतोय ‘हा’ प्रकार

Advertisement
Advertisement

Leave a Reply