Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांना करावी लागणार ई-पिक पाहणीची नोंद, कशी करणार, मग वाचा की..

आपल्या शेतातील पिकांची नोंद आता स्वत: शेतकऱ्यांनाच सात-बारा उताऱ्यावर करायची आहे. त्यासाठी कृषी आणि महसूल विभागानं संयुक्तपणे ई-पीक पाहणी नावाचा उपक्रम हाती घेतला आहे. या पीक पाहणीची नोंद शेतकऱ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत करावी लागणार आहे. पूर्वी हे काम तलाठी करीत असत. मात्र, आता तलाठ्यांना आराम देताना, हे काम शेतकऱ्यांनाच करावे लागणार आहे. आपल्या पिकांची नोंद शेतकरी ‘ई-पीक पाहणी’ अॅपच्या माध्यमातून सात-बारा उताऱ्यावर करु शकणार आहेत.

Advertisement

एखाद्या गावात नेमकं किती क्षेत्र पिकाखाली आहे, याची माहिती या उपक्रमामुळे समजणार आहे. त्यातून सरकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी अपलोड केलेले पिकांचे फोटो ‘real time data capture’ करणार आहेत, म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने नेमका कोणत्या गट क्रमांकातून आणि खाते क्रमांकातून तो फोटो काढला, हे कळणार असल्याचा सरकारचा दावा आहे.

Advertisement

दरम्यान, सरकारच्या या उपक्रमावर मोठ्या प्रमाणात टीकाही होत आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत. काही ठिकाणी इंटरनेट कनेक्शन नाही. शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीबाबत पुरेसे प्रशिक्षणही दिलेले नाही, मग अशा शेतकऱ्यांचा सात-बारा कोराच राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement

ही बाब लक्षात आल्यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून ई-पीक पाहणीच्या अंमलबजावणीकरता शेतकऱ्यांवर सक्ती करू नये, पीक पाहणी कार्यक्रम शासकीय यंत्रणेकडूनच राबविण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

Advertisement

पिकांची नोंद कशी करणार..?
मोबाईलवरील प्ले-स्टोअरवर E-Peek Pahani असे सर्च करुन ते इन्स्टॉल करा. ते ओपन केल्यावर ई-पीक पाहणी पेज समोर येईल.

Advertisement

ई-पीक पाहणी प्रकल्प संपूर्ण राज्यात राबवण्यात येत आहे, असं तिथं नमूद केलेलं असेल. त्याला डावीकडे सरकवल्यास हे अॅप वापरण्यासाठी लागणारी माहिती तिथं दिलेली असेल.

Advertisement

पुन्हा एकदा डावीकडे सरकवल्यास पिकांची नोंदणी करण्यासाठी ज्या बाबींची मदत होऊ शकेल, त्या दिलेल्या असतील. जसं की सात-बारा उतारा, 8-अ इत्यादी.

Advertisement

इथं असलेल्या पुढे या पर्यायावर क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबर टाकून पुढे वर क्लिक करायचं आहे. जिल्हा, तालुका गाव निवडून पुढे वर क्लिक करा.

Advertisement

त्यानंतर पहिलं, मधलं किंवा आडनाव, तसेच गटक्रमांक टाकून तुम्ही खातेदार निवडू शकता. गटक्रमांक टाकून शोधावर क्लिक करायचं आहे. मग त्या गटातील खातेदार तुम्हाला निवडायचा आहे. मग नोंदणी अर्जासाठी आपण निवडलेली माहिती तपासून पाहायची आहे. त्यानंतर पुढे या पर्यायावर क्लिक करा.

Advertisement

आता तुम्ही जो मोबाईल क्रमांक दिला असेल, त्यावर तुमची नोंदणी करण्यात येत आहे, असा मेसेज येईल. तुम्हाला नंबर बदलायचा असल्यास मोबाईल क्रमांक बदला, हे बटण दाबा किंवा पुढे वर क्लिक करा. या नंबरवर एक सांकेतांक क्रमांक पाठविला जाईल. हाच नंबर या अॅपवर शेतकऱ्यांना लॉग इन करण्यासाठी वापरावा लागणारा आहे.

Advertisement

आता तिथं एक सूचना येईल – मोबाईलवर सांकेतांक क्रमांक पाठवला आहे, तो स्क्रीनवरील रिकाम्या चौकटीत टाका. इथं ‘ठिक आहे’ असं क्लिक करा. मोबाईलवर आलेला सांकेतांक क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे आणि सांकेतांक भरा यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही अॅपवर पिकांची नोंद करू शकता.

Advertisement

इथं सुरुवातीला परिचय द्यायचा आहे. त्यात खातेदाराचा फोटो असेल, तर तो निवडायचा आहे. त्यानंतर लिंग निवडलं की खातेदाराचं संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर तिथं आपोआप येईल. मग खातेदाराची माहिती यावर क्लिक करा. त्यानंतर खाते क्रमांक निवडायचा आहे. मग परिचयमध्ये परत येऊन सबमिट वर क्लिक करायचं आहे. तुमची नवीन माहिती अद्ययावत झाली, असा तिथं मेसेज येईल. इथं ठीक आहे वर क्लिक करा.

Advertisement

पिकाची माहिती कशी नोंदविणार...
सुरुवातीला तुम्हाला खाते क्रमांक आणि त्यानंतर गट क्रमांक निवडायचा आहे. त्यानंतर या गट क्रमांकात संबंधित शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे ही माहिती तिथं आपोआप येईल. पुढे हंगाम (खरीप की संपूर्ण वर्ष) निवडला की पीक पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र आपोआप येईल. या क्षेत्रापेक्षा अधिक जमिनीवर तुम्हाला पिकांची नोंद करता येणार नाही.

Advertisement

त्यानंतर पिकाचा वर्ग जसं की निर्भेळ पीक आहे की मिश्र पीक किंवा इतर ते निवडायचं आहे. पुढे मुख्य पीक निवडून ते किती गुंठ्यांमध्ये आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर मग दुय्यम पीक 1 आणि दुय्यम पीक 2 टाकून त्यासमोर ते किती क्षेत्रावर आहे, ते टाकायचं आहे.

Advertisement

एकदा का ही माहिती भरून झाली की पुढे जल सिंचनाचे साधन जसं की विहीर, तलाव हे निवडायचं आहे. त्यानंतर सिंचन पद्धत आणि लागवडीची तारीख निवडायची आहे. ही सगळी माहिती भरून झाली की तुम्हाला आपण वरती जे पीक मुख्य म्हणून सांगितलं त्याचा फोटो अपलोड करायचा आहे. हा फोटो तुम्हाला तुमच्या शेतातून अपलोड करायचा आहे.

Advertisement

फोटो काढून झाला की ओके या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पिकांची नोंद केली ते पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यावरील शेवटच्या सबमिट करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. तिथं सूचना येईल की, पीक माहिती सबमिट आणि अपलोड झाली आहे. तिथं ठीक आहे यावर क्लिक करायचं आहे.

Advertisement

आता आपण नोंदवलेली पिकांची माहिती पाहण्यासाठी पिकांची माहिती या पर्यायावर क्लिक करायचं आहे. नंतर स्क्रीनवर तुम्हाला कोणत्या गटातल्या कोणत्या खाते क्रमांकात कोणत्या पिकाची नोंद करण्यात आली आहे, ही माहिती तिथं दिसेल.

Advertisement

आता तुम्हाला दुसऱ्या एखाद्या गटातल्या किंवा इतरही पिकांची नोंद करायची असेल तर + या बटनावर क्लिक करून तुम्ही आताची प्रक्रिया पुन्हा करू शकता. अशाचप्रकारे या अॅपवरून तुम्ही कायम पड, बांधावरची झाडंही नोंदवू शकता. एकदा का ही सगळी माहिती भरून झाली की तलाठी कार्यालयात या माहितीची छाननी केली जाईल आणि मग सातबाऱ्यावर पिकांची नोंद होईल.

Advertisement

बाब्बो..! दोन विद्यार्थी रात्रीत करोडपती…वाचा नेमकं कसं…
अर्र… मोफत धान्य वितरण बंद तरीही मिळणार मोफत धान्य; पहा, कोणत्या राज्यात घडतोय ‘हा’ प्रकार

Advertisement
Advertisement

Leave a Reply