Take a fresh look at your lifestyle.

चक्क राऊतांनी केली मोदींची स्तुती….वाचा काय म्हणाले संजय राऊत…

नरेंद्र मोदींकडे एक वेगळाच दृष्टीकोण आहे. त्यामुळे देशात मोदींसारखा दुसरा कोणीही नाही,

मुंबई : राज्यात भाजपा शिवसेनेत सध्या चांगलेच वाक्-युध्द रंगलेले असते. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट विरोधकांच्या गोटात सामील होत राहुल गांधी यांच्या नेतृत्वात एकीची हाक दिली होती. तर त्यानंतर भाजपा शिवसेनेतील संघर्ष वाढत गेला. मात्र आता संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

Advertisement

संजय राऊत हे सामनातून कायम भाजपा आणि मोदी सरकावर टीका करताना दिसतात. मात्र आता संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मोदींची स्तुती केली. यावेळी त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील एक प्रसिध्द व्यक्तीमत्व आहे. तर त्यांनी अटलबिहारी वाजपेयीनंतर भाजपाला वेगळ्या उंचीवर नेले आहे. तर मोदींनी देशाला राजकीय स्थैर्य दिले आहे, असे माध्यमांशी बोलतांना राऊत यांनी म्हटले आहे.

Advertisement

पढे बोलताना राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदींकडे एक वेगळाच दृष्टीकोण आहे. त्यामुळे देशात मोदींसारखा दुसरा कोणीही नाही, असे राऊत म्हणाले. तर भाजपाच्या वतीने नरेंद्र मोदींच्या 71 व्या वाढदिवसाच्या निमीत्ताने सेवा समर्पण अभियान सुरू केले आहे. ते 7 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.

Advertisement

तर यावेळी राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सोनु सुद प्रकरणावरही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, सोनु सुद हा दिल्ली सरकारचा दुत म्हणून काम करत होता. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई केली असण्याची शक्यता आहे.

Advertisement

मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केल्याने पुन्हा राज्यात राजकीय खळबळ होणार का? अशीही चर्चा सुरू आहे. कारण काल चंद्रकांत पाटील यांनी दोन तीन दिवसात खळबळ होणार असल्याची भविष्यवाणी केली होती. परंतू राऊत यांनी आपल्या खास शैलीत चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली.

Advertisement

गुजरात भाजपमध्ये तणातणी; शपथ ग्रहण पुढे ढकलले..! पहा कोणत्या मुद्द्यावर पेटलाय वाद

Advertisement

बालपणीच्या गाण्यातील रेल्वे इंजिन भंगारात…जाणून घ्या कारण…

Advertisement

दिल्ली धुमश्चक्रीबाबत संजय राउतांनी म्हटले ‘हे’; मोदी सरकारला केले लक्ष्य

Advertisement
Advertisement

Leave a Reply