Take a fresh look at your lifestyle.

अर्र… चीन सरकारने घेतलाय अजब निर्णय; ‘त्या’ भितीमुळे खासगी शाळाच केल्यात बंद

बीजिंग : चीनसारखा साम्राज्यवादी देश कधी काय करेल याचा काहीच अंदाज नाही. त्यामुळेच चीनच्या कारवायांनी नेहमीच काहीना काहीतरी वाद निर्माण होतोच. आताही चिनी सरकारने घेतलेल्या एका निर्णयावर संताप व्यक्त होत आहे. चीनने हा निर्णय कोणत्या देशाच्या विरोधात घेतलेला नाही. तर स्वतःच्याच देशातील शिक्षण क्षेत्राविरोधात घेतला आहे. या निर्णयामुळे चीनमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, कठोर निर्णय घेऊन त्यावर नेहमीच ठाम राहणाऱ्या चिनी सरकारने देशांतर्गत विरोधाचा सध्यातरी विचार केलेला नाही.

Advertisement

चीनने आपली हुकूमशाही विचारधारा दाखवणारा एक निर्णय नुकताच घेतला आहे. देशातील कम्युनिस्ट सरकारने परदेशी विचारधारेचा प्रभाव मुलांवर पडू नये, यासाठी खासगी शिकवणी आणि शाळांवर थेट बंदी घातली आहे. चिनी तज्ज्ञांच्या मते, सरकारने हा निर्णय खासगी क्षेत्रावर नजर ठेवण्यासाठी आणि सरकारी शाळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने घेतला आहे. पण, या निर्णयाच्या अन्य उद्देशांवरही देशात चर्चा होत आहे. त्यामुळे या निर्णयावर संताप व्यक्त होत आहे.

Advertisement

परदेशी विचारधारेबद्दल चिनी सरकारच्या मनातील रोष या निर्णयाद्वारे दिसून येत आहे. खासगी शिकवणी आणि शाळांच्या माध्यमातून परदेशी विचारधारेचा मुलांवर प्रभाव पडू शकतो, अशी भिती सरकारला वाटत आहे. हा निर्णय का घेतला याचे स्पष्टीकरणही सरकारने दिले आहे. मात्र, सामान्यांना ते पटलेले नाही. त्यामुळे भविष्यात या निर्णयावर आणखी काय प्रतिक्रिया येतात, विरोध वाढला तर चिनी सरकार हा निर्णय मागे घेणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

दरम्यान, चीन ज्या पद्धतीने परदेशी विचारधारेच्या विरोधात आहे. त्याच पद्धतीने जगात असेही काही देश आहेत की ज्यांनी चिनी विचारधारेच्या विरोधात आंदोलने केली आहेत. युरोपातील हंगेरी या देशातील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी असेच चिनी विचारधारेविरोधात आंदोलन केले होते. या देशाची राजधानी बुडापेस्ट येथे चीनच्या फुदान युनिवर्सिटीचे कॅम्पस सुरू केले जाणार होते. मात्र, लोकांनी या निर्णयास तीव्र विरोध करत आंदोलन सुरू केले. चीनच्या दबावामुळे सरकारने हा निर्णय घेतला असा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. कॅम्पस जर सुरू झाले तर येथे चिनी कम्युनिस्ट विचारांचा दबदबा वाढेल, अशी भिती लोकांना वाटत होती. त्यामुळेच नागरिकांनी चीनच्या विरोधात हे आंदोलन केले होते.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply