Take a fresh look at your lifestyle.

… म्हणून पाकिस्तानवर भडकलाय चीन; ‘त्या’ प्रकल्पावरुन पाकिस्तानवर केलेत गंभीर आरोप; पहा, काय आहे मित्र देशांतील वाद

नवी दिल्ली : चीनच्या महत्वाकांक्षी सीपीइसी प्रकल्पासाठी चीनने पाण्यासारखा पैसा ओतला आहे. पाकिस्तानला अब्जावधींचे कर्ज दिले आहे. पाकिस्तान आता चीनच्या जाळ्यात पुरता अडकला आहे. असे असले तरी याचा फटका चीनला सुद्धा बसत आहे. कारण, ज्या प्रकल्पात चीनने अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे, त्या प्रकल्पाचे काहीच कामकाज करता आलेले नाही.

Advertisement

पाकिस्तान मध्ये या प्रकल्पाचे कामकाज अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे चीन पाकिस्तानवर चांगलाच भडकला आहे. चिनी कंपन्या कमालीच्या नाराज आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानने सीपीइसी प्रकल्पाचे वाटोळे केले, अशी तक्रार चिनी राजदूताने केली आहे, असे पाकिस्तानच्या सिनेट स्थायी समितीच्या अध्यक्षांनी सांगितले.

Advertisement

चीनच्या या धोरणामुळे पाकिस्तानच्या अडचणी मात्र वाढणार आहे. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीइसी) हा चीनच्या बेल्ट अँड रोड योजनेचा एक भाग आहे. या प्रकल्पात चीनने तब्बल 60 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. मात्र, मागील तीन महिन्यांपासून प्रकल्पाचे काहीच कामकाज झालेले नाही. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रकल्प पूर्ण करण्यात अनेक अडचणी येत आहेत. पाकिस्तानच्या काही प्रांतातील नागरिकांचा या प्रकल्पास विरोध आहे.

Advertisement

त्यांच्याकडून कामकाजात अडथळे आणण्याचा प्रयत्न सुरू असतो. त्यामुळेही अडचणी वाढल्या आहेत. पाकिस्तानचे राज्यकर्ते सुद्धा याबाबतीत अपयशी ठरत आहेत. अशा परिस्थितीत चीनचे मात्र नुकसानच होत आहे. आधीच पाकिस्तानला अब्जावधींचे कर्ज दिले आहे. या कर्जाचे पैसे केव्हा मिळतील याचा अंदाज नाही. त्यातच आता सीपीइसीचे कामही होत नाही, त्यामुळे चीनला मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Advertisement

सीपीइसी प्रकल्पाचा मुद्दा हा आजचा नाही. सुरुवातीपासूनच या प्रकल्पात अडचणी येत आहेत. नागरिकांचा विरोध वाढत आहे. त्यामुळे चीनच्या अडचणी वाढल्या आहेत. अन्य देशांपेक्षा वेगळाच अनुभव चीनला येत आहे. आता चीनने स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. आरोपही केले आहेत. यानंतर आता पाकिस्तान काय धोरण घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply