Take a fresh look at your lifestyle.

वाळवंटातील जहाजावर आलेय मोठे संकट; ऊंटांच्या संरक्षणासाठी ‘या’ राज्याचा असा आहे प्लान

जयपूर : वाळवंटातील जहाज म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या उंट या प्राण्यांवर मोठे संकट ओढवले आहे. ऊंटांची संख्या सातत्याने कमी होत असल्याने राजस्थान सरकारचे टेन्शन वाढले आहे. या प्राण्यांची संख्या या पद्धतीने कमी होत गेली तर काही वर्षांनी ऊंट फक्त प्राणी संग्रहालयातच दिसतील, अशी भिती व्यक्त होत आहे. राज्यात ऊंटांची संख्या कमी होण्यामागील कारणांचा शोध घेऊन त्यानुसार उपाययोजना करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार कार्यवाही करत आहे.

Advertisement

राज्यात ऊंटांचे संरक्षण करण्यासाठी ऊंट शाळा सुरू करण्यावर सरकार विचार करत आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ऊंटांची संख्या वेगाने कमी होत आहे. त्यामुळे या प्राण्यांचे संरक्षण करणे जास्त महत्वाचे आहे. त्यासाठी सरकार लवकरच ऊंट शाळा सुरू करण्याचा निर्णय घेईल, असे सांगण्यात येत आहे. राज्यातील ग्रामीण भागात दळणवळणाची व्यवस्था चांगली नाही. त्यामुळे ऊंटांच्या संख्येत घट होत आहे, असे पशुपालन मंत्री लालचंद कटारिया यांनी सांगितले. राजस्थान ऊंट अधिनियम 2015 अंतर्गत परवानगी शिवाय ऊंटांना राज्याबाहेर घेऊन जाण्यास मनाई आहे. या कारणामुळे सुद्धा ऊंटांची संख्या कमी होत आहे.

Advertisement

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सन 2015 मध्ये राज्यात जवळपास साडेतीन लाख ऊंट होते. त्यानंतर 2019 मध्ये मात्र राज्यात फक्त 2 लाख 13 हजार ऊंट शिल्लक राहिले आहेत. ऊंटांच्या संरक्षणासाठी तातडीने निर्णय घेतले गेले नाहीत तर काही वर्षांनी ऊंट फक्त प्राणी संग्रहालयातच दिसतील, असे कटारिया यांनी सांगितले.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply