Take a fresh look at your lifestyle.

आज सोने आणि चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या काय आहेत आजचे नवीन दर

मुंबई : मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दर सातत्याने कमी होत होते. सोने तर 46 हजारांच्याही खाली आले होते. आज मात्र हा ट्रेंड बदलला आहे. आज सकाळच्या सत्रात दोन्ही धातूंच्या दरात वाढ नोंदवण्यात आली. सोन्याचे दर 130 रुपयांनी वाढले आहेत. तर चांदीच्या दरात सुद्धा 300 रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे आता मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजमध्ये सोन्याचा भाव 46 हजार 132 रुपये प्रति दहा ग्रॅम असा आहे. यामध्ये 58 रुपये वाढ झाली आहे. सध्या एक किलो चांदीचा भाव 61 हजार 302 रुपये असा आहे. यामध्ये 22 रुपये वाढले आहेत.

Advertisement

देशात सध्याच्या परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत आहेत. कधी कमी तर कधी जास्त असा ट्रेंड सुरू आहे. यामुळे सोन्याचे दर बरेच कमी झाले आहेत. एक वेळी असे वाटत होते की सोने 50 हजारांच्या पुढे जाईल. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोने 56 हजारांच्याही पुढे गेले होते. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे यावेळी सुद्धा सोने 50 हजरांच्या पुढे जाईल असे वाटत होते. त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला. राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे.

Advertisement

दरम्यान, आता सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे सोन्यास मागणी वाढण्याची शक्यता आहे. साधारण ऑक्टोबर महिन्यात मागणीत वाढ होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. असे घडले तर सोन्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानुसार आज सोन्याचे दर काही प्रमाणात वाढल्याचे दिसून आले.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply