Take a fresh look at your lifestyle.

मान्सून अपडेट : राज्यात ‘या’ दिवशी होणार पाऊस; हवामान विभागाने ‘या’ जिल्ह्यांना दिलाय अलर्ट

मुंबई : सप्टेंबर महिन्यात सुरुवातीचे काही दिवस जोरदार बरसल्यानंतर आता राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. आगामी दोन दिवसात राज्यात पाऊस होईल अशी शक्यता नाही. मात्र, विकेंडनंतर राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. रविवारी हवामान विभागाने नंदूरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या चार जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. या व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यांत मात्र हवामान कोरडे राहिल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Advertisement

राज्यात सध्या कुठेही पाऊस नाही. पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, अनेक जिल्ह्यात ढगाळ हवामान आहे. नगर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी ढगाळ हवामान आहे. परंतु, पाऊस पडलेला नाही. विकेंडनंतर मात्र पावसाची शक्यता व्यक्त होत आहे. सोमवारसाठी नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सात जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

Advertisement

तर मंगळवारी पालघर, अमरावती, अकोला, वर्धा आणि नागपूर या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. या दोन दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Advertisement

यावेळी मान्सूनचा परतीचा पाऊस लांबण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पावसामुळे पिकांचे नुकसान होत असल्याचा नेहमीचा अनुभव आहे. यावेळी मात्र पाऊस लांबणार असल्याने पिके काढणीसाठी वेळ मिळणार आहे. यावेळी 15 दिवस उशीराने परतीचा पाऊस सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. देशात अन्य राज्यातही जोरदार पाऊस होत आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply