Take a fresh look at your lifestyle.

विराट कोहलीचा राजीनामा…भावनिक पोस्ट व्हायरल… वाचा नेमकं कारण…

विराट आपल्या खेळातून चाहत्यांना कायम खूश करत आला आहे. विराटची बॅट तळपली की धावांचा पाऊस होणार हे सांगायला कोणत्याही हवामान खात्याची गरज पडत नाही.

दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या बॅटचा देशात मोठा चाहता वर्ग आहे. विराट मैदानावर उतरल्यानंतर त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडावा, अशी मनोकामना करणारे अनेक चाहते आहेत. तर विराट आपल्या खेळातून चाहत्यांना कायम खूश करत आला आहे. विराटची बॅट तळपली की धावांचा पाऊस होणार हे सांगायला कोणत्याही हवामान खात्याची गरज पडत नाही. मात्र टी-20 विश्वचषकानंतर  विराटचा खेळ पाहण्यास प्रेक्षकांना मुकावे लागणार आहे. कारण विराटने भावनिक पोस्ट लिहीत राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे.

Advertisement

भारतीय चाहत्यांचा लाडका कर्णधार असलेला विराट कोहलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत म्हटले की, भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करायला मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. तर मी त्या सर्वांचे आभार मानतो. ज्यांनी मला भारतीय संघाचा कर्णधार म्हणून माझ्या प्रवासात मला पाठींबा दिला. माझे सहकारी, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, प्रशिक्षक आणि प्रत्येक भारतीय ज्यांनी माझ्या विजयासाठी प्रार्थना केली, त्या सर्वांशिवाय मी हे करू शकलो नसतो. तर विराट पुढे म्हणाला की, तुमच्यावरील कामाचा ताण लक्षात घेणं महत्वाचं असतं. तर मी गेले 8-9 वर्षे तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळत आहे आणि गेल्या 5-6 वर्षापासून भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे माझं असं मत आहे की, भारतीय वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी पुर्ण वेळ द्यायला हवा.

Advertisement

Advertisement

विराटने पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी टी-20 कर्णधार म्हणून माझ्या संघासाठी सर्वकाही दिले आणि यापुढेही एक बॅट्समन म्हणून माझे सर्वोत्तम देत राहिल. तर यावेळी विराटने पोस्टमध्ये नमुद केले आहे की, कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतांना माझ्या जवळच्या लोकांंशी, प्रशिक्षक रवी शास्री, सध्याचा सहकारी रोहित शर्मा आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सोरव गांगुली आणि सचिव जय शहा यांना निर्णय कळवला आहे. त्यामुळे विश्वचषकानंतर विराट भारतीय टी-20 संघात फक्त एक फलंदाज म्हणून खेळणार आहे.

Advertisement

विराट कोहलीने टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर कर्णधारपदाचा राजीनामा देणार असल्याचे ट्वीट आणि भावनिक पोस्टद्वारे देशातील चाहत्यांना माहिती दिली. तर कोहलीच्या राजीनाम्यानंतर बीसीसीआय भारतीय टी-20 संघासाठी सक्षम कर्णधाराची निवड करणार आहे. त्यामुळे विराट कोहली त्यानंतर टी-20 संघात फक्त फलंदात तर वनडे आणि कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. Virat Kohli to step down as India’s T20 captain after World Cup

Advertisement
Advertisement

Leave a Reply