Take a fresh look at your lifestyle.

…म्हणून रवी शास्री देणार राजीनामा…वाचा नेमकं कारण…

येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. मात्र या दौऱ्यात रवी शास्री भारतीय संघाच्या मुख्य़ प्रशिक्षक पदावर असणार नाहीत.

दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून रवी शास्री आणि विराट कोहली यांच्यात कलह असल्याचा बातम्या येत आहेत. तर मँचेस्टर कसोटी सामना रद्द झाल्यानंतर देशभरातून रवी शास्री यांना मोठ्या प्रमाणावर टीकेला  सामोरे जावे लागले होते. मात्र आता रवी शास्री राजीनामा देणार असल्याचे वृत्त आहे.

Advertisement

येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. मात्र या दौऱ्यात रवी शास्री भारतीय संघाच्या मुख्य़ प्रशिक्षक पदावर असणार नाहीत. तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघासोबत नवे प्रशिक्षक असतील. या दौऱ्यात भारतीय संघ तीन कसोटी सामन्यांची मालिका, 3 वन डे आणि 4 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणा आहे. मात्र या दौऱ्यापुर्वीच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले रवी शास्री आपल्या पदावरून पायउतार होणार आहेत.

Advertisement

रवी शास्री भारताचे मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने 43 कसोटींपैकी 25 कसोटींमध्ये विजय मिळवला आहे. तर 72 वनडे पैकी 51 वनडे सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. याबरोबरच टी-20 समान्यांमध्ये 60 पैकी 40 सामन्यात विजयी कामगिरी आहेे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवला. तर रवी शास्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने 2019 च्या विश्वचषकामध्ये सेमीफायनलपर्यंत झेप घेतली होती. तर त्यांच्या कार्यकाळात कसोटी मालिकेतील विजयाची टक्केवारी 60 टक्के, वनडेमध्ये 67 टक्के तर टी-20 मध्ये 66 टक्के इतकी आहे. तर रवी शास्री 2017 मध्ये भारताचे मुख्य प्रशिक्षक बनले होते. त्यांना 2019 मध्ये त्यांचा करार टी-20 वर्ल्डकपपर्यंत वाढवला होता. मात्र आता टी-20 वर्ल्डकपनंतर त्यांचा करार संपणार आहे.

Advertisement

टी-20 वर्ल्डकपनंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यापर्यंत करार वाढवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र रवी शास्री यांनी बीसीसीआयला (BCCI) नकार दिला. त्यामुळे बीसीसीआय मुख्य प्रशिक्षक पदासह सपोर्ट स्टाफसाठी अर्ज मागवू शकते. त्यामुळे रवी शास्री राजीनामा देणार आहेत, असे वृत्त इनसाईड स्पोर्टस् ने बीसीसीआयच्या सु्त्रांच्या हवाल्याने दिले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपुर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याने राहुल द्रविड भारताचे हंगामी प्रशिक्षक असतील असे विधान केले होते. त्यामुळे राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक बनणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply