Take a fresh look at your lifestyle.

सावधान! कोरोनापाठोपाठ आता ‘त्या’ आजाराचा कहर…रूग्णालयातील परिस्थिती गंभीर..वाचा

कोरोनाच्या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच आता देशात नव्या संकटाने देशाची चिंता वाढवली आहे. बिहारमध्ये गेल्या महिनाभरात तब्बत 25 चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.

दिल्ली: 2020 सुरू झाल्यापासून कोरोनाने  थैमान घातले होते. त्यात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले. मात्र अजूनही कोरोना आपली पाठ सोडायला तयार नाही. गेल्या 24 तासात देशात 27 हजार 176 कोरोना रूग्णांचे निदान झाले आहे तर 284 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशात एकूण कोरोना रूग्णांची संख्या 3 कोटी 33 लाख 16 हजार 755 इतकी झाली आहे. मात्र देश कोरोना महामारीचा सामना करत असताना देशात अनेक आजार समोर यायला लागले आहेत. यातच कोरोनापाठोपाठ आता नव्या आजाराने देशात कहर केला आहे.

Advertisement

कोरोनाच्या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच आता देशात नव्या संकटाने देशाची चिंता वाढवली आहे. बिहारमध्ये गेल्या महिनाभरात तब्बत 25 चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. तर मुजफ्फरपुर, गोपाळगंज, चंपारण, सीवानन आणि मधुबन येथे या आजाराने थैमान घातले आहे. अनेक चिमुकल्यांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पाटणामधील सर्वात मोठ्या रूग्णालयांतील बेड पुर्ण झाले आहेत. त्यामुळे बिहारमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर बिहार सरकारच्या आरोग्य विभागाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. मात्र या व्हायरल फिवरच्या वेगाने होणाऱ्या संसर्गामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे.

Advertisement

भागलपुर येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज रूग्णालयात तब्बल सातशेहून अधिक बेड आहेत. मात्र सध्या रूग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने रूग्णालयात बेडच शिल्लक राहिले नाहीत. जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज रूग्णालयात व्हायरल फिवरमुळे अनेक रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र या रूग्णालयात एका बेडवर तीन चिमुकल्यांना अॅडमिट करण्यात आले आहे. तर या रूग्णालयात सध्या 71 लहान बालकांवर उपचार करण्यात येत आहेत. मात्र त्यातील तब्बल 45 बालके व्हायरल फिवरमुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. सर्व रूग्णांची रूग्णालय प्रशासन काळजी घेत आहे. मात्र तरीही रूग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे व्हायरल फिवर हा कोरोनाचा साईड इफेक्ट असल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

व्हायरल फिवर कोरोनाचा साईड इफेक्ट असल्याचे म्हटले जात आहे, त्यामुळे बिहार सरकारच्या आरोग्य विभागाने काही टीम तयार केल्या असून त्या सर्व जिल्ह्यांमध्ये पाठवल्या आहेत. तर आरोग्यमंत्र्यांनीही या परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचे म्हटले आहे. तसेच आरोग्य मंत्री सातत्याने आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. याबरोबरच मुलांवर योग्य उपचार करण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणांना देण्यात आले आहेत. मात्र डॉक्टरांनी व्हायरल फिवर हा कोरोनाचा साईड इफेक्ट असल्याचे म्हटले आहे. कारण लहान मुलांना यामुळे श्वास घेण्यास अडचणी येत असल्याचे चित्र आहे. तर रोज मुलांंना रूग्णालयात भरती करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाच टेन्शनमध्ये आली आहे.

Advertisement

कोरोनाच्या थैमानामुळे बेजार झालेल्या सामान्य नागरीकांमध्ये व्हायरल फिवरमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. त्यामुळे नागरीकांनी दक्षता घ्यावी, अशा सुचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply