Take a fresh look at your lifestyle.

‘येथे’ पडलाय भीषण दुष्काळ..! 230 रुपये किलो साखर; दुकानांमध्ये खडखडाट; पहा, कशामुळे आलीय ‘ही’ वेळ

नवी दिल्ली : भारताच्या शेजारी देशांमध्ये सध्या कोरोना काळात अनेक संकटे निर्माण झाली आहेत. अन्न धान्याच्या टंचाईने पाकिस्तान चांगलाच हैराण झाला आहे. त्यानंतर आता असेच संकट श्रीलंकेतही आले आहे. हा लहान देश सध्या मोठ्या आर्थिक संकटात अडकला आहे. देशात खाण्यापिण्याच्या वस्तू, गहू, तांदूळ यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड दुष्काळ पडला आहे. सुपर मार्केट्सच्या बाहेर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र, त्यांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागत आहे, अशी येथील परिस्थिती आहे. सर्वदूर पडलेला दुष्काळ आणि सरकारी तिजोरीतील खडखडाट यांमुळे देशात असे संकट निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

कोरोना काळात अनेक वस्तूंच्या आयातीवर निर्बंध होते. तसेच अनेक व्यापाऱ्यांनी साठेबाजी केल्यामुळे मोठा साठा बाजारात आला नाही. तसेच कोरोनामुळे देशाच्या पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. परकीय चलन साठा सुद्धा कमी झाला आहे. श्रीलंका सरकारने सध्या 600 पेक्षा जास्त वस्तूंच्या आयातीवर निर्बंध टाकले आहेत. त्यामुळे महागाईत वाढ झाली आहे. मागणी वाढली आहे त्यातुलनेत पुरवठा मात्र होत नाही. त्यामुळे देशातील काही भागात एक किलो साखर 120 रुपयांना तर काही ठिकाणी 190 ते 230 रुपयांना विक्री होत आहे.

Advertisement

कोरोना काळात श्रीलंकेत अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. पाकिस्तानमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे. येथे काही प्रांतात पिण्याची पाण्याची मोठी टंचाई आहे. तसेच अन्न धान्याचाही दुष्काळ पडला आहे. या संकटात देशांच्या अर्थव्यवस्था सुद्धा डबघाईस आल्या आहेत. कोरोना संकट कायम असताना आता या नव्या संकटांचा सामना करावा लागत आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply