Take a fresh look at your lifestyle.

दोन महिन्यात जगात पहिल्यांदाच घडलेय ‘असे’ काही; पहा, ‘डब्ल्यूएचओ’ने नेमके काय म्हटलेय..

जिनेव्हा : जगात अजूनही कोरोना मुक्कामी आहे. आता तर या घातक विषाणूच्या नव्या व्हेरिएंटने 180 पेक्षा जास्त देशांमध्ये थैमान घातले आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. मृत्यूंच्या संख्येत सुद्धा वाढ होत आहे. त्यामुळे पुन्हा कडक निर्बंध, लॉकडाऊन असे प्रकार सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे, लसीकरण सुरू असताना काही देशात कोरोना वेगाने फैलावत आहे. त्यामुळे टेन्शन वाढले आहे. अशा संकटाच्या घडीत एक आनंदाची बातमी मिळाली आहे. होय, जागतिक आरोग्य संघटनेने यावेळी दिलासादायक माहिती दिली आहे. मागील दोन महिन्यांच्या काळात पहिल्यांदाच असे घडले आहे.

Advertisement

मागील आठवड्यात जगभरात नोंदवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे. मागील दोन महिन्यांच्या काळात प्रथमच रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. विशेष म्हणजे, जगातील सर्वच भागांमध्ये रुग्णसंख्येत घट झाली आहे. मृत्यूंची संख्या सुद्धा कमी झाली आहे. आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण दक्षिण-पूर्व आशिया भागात आहेत.

Advertisement

तर आफ्रिकेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूसंख्येत 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिका, भारत, इराण, ब्रिटेन आणि तुर्की या देशांत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद घेण्यात आली. वयस्कर लोकांच्या तुलनेत लहान मुले व तरुणांना कमी प्रमाणात संक्रमण होत आहे. तरुणांचा मृत्यूदर देखील कमी आहे, असे संघटनेने म्हटले आहे.

Advertisement

याआधी आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी असा इशारा दिला होता, की जग कोविड १९ च्या महामारीच्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. डेल्टासारखे व्हेरिएंट आधिक संक्रामक असून बऱ्याच देशांमध्ये पसरत आहे. अद्याप कोणताही देश या संकटातून बाहेर आलेला नाही.

Advertisement

कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आधिक धोकादायक आहे, आणि काळानुसार तो आणखी बदलत आहे. त्यामुळे आपणास सतत देखरेख ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले होते. आजमितीस जगातील 180 पेक्षा जास्त देशांमध्ये हा व्हेरिएंट पसरला आहे. लसीकरण वेगाने न केल्यास यामुळे अवघे जग संकटात सापडू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

Advertisement

आतापर्यंत कोरोनाच्या जितक्या व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे, त्यामध्ये डेल्टा व्हेरिएंट सर्वाधिक संक्रामक आहे. कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या लोकांमध्ये हा व्हेरिएंट वेगाने फैलावत आहे. याच काळात काही देशांनी लॉकडाऊनचे निर्बंधांत सवलती दिल्या आहेत. त्यामुळे सुद्धा जगभरात कोरोना संक्रमण पुन्हा वाढत चालले आहे.

Advertisement

कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर सप्टेंबरपर्यंत प्रत्येक देशात किमान १० टक्के तरी लसीकरण झाले पाहिजे, असे आवाहन डब्ल्यूएचओने केले आहे. जोपर्यंत जगातील प्रत्येक ठिकाणी महामारी नष्ट होणार नाही तोपर्यंत या महामारीचा पूर्णपणे नायनाट होणार नाही. जगात काही देश लसीकरणात खूप पुढे गेले आहेत तर काही देशात अजूनही कोरोना प्रतिबंधक लस मिळालेल्या नाहीत.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply