Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो… देशातील फक्त 10 टक्के लोकांकडे आहे ‘इतकी’ संपत्ती; पहा, ‘त्या’ अहवालाने दिलीय धक्कादायक माहिती

नवी दिल्ली : देशातील श्रीमंत आणि गरीब व्यक्तींच्या मालमत्तेबाबत नुकताच एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात जे काही सांगितले आहे. ते निश्चितच विचार करण्यास भाग पाडणारे आहे. देशातील फक्त 10 टक्के श्रीमंतांकडेच देशातील निम्म्यापेक्षा जास्त संपत्ती आहे. तर दुसरीकडे देशातील 50 टक्के नागरिकांकडे संपत्तीचा केवळ 10 टक्के हिस्सा आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

Advertisement

म्हणजेच, देशातील निम्म्यापेक्षा जास्त संपत्ती काही मोजक्या श्रीमंतांकडेच असल्याचे स्पष्ट होत आहे. श्रीमंत आधिक श्रीमंत होत आहेत तर गरीब आधिक गरीब होत आहे, असे जे नेहमी आपल्या कानी पडत असते, ते सरकारच्या या अहवालावरुन खरेच असल्याचे सिद्ध होत आहे.

Advertisement

‘ऑल इंडिया डेप्ट अँड इन्व्हेस्टमेंट सर्वे 2019’ नुसार, देशातील 10 टक्के श्रीमंतांकडेच शहरी भागातील 55.7 टक्के संपत्ती आहे. तर ग्रामीण भागात 50.8 टक्के इतकी संपत्ती श्रीमंत व्यक्तींकडे आहे. केंद्र सरकारने केलेल्या या सर्वेत काही निकष निश्चित केले होते. त्यानुसार हा सर्वे केला होता. यामध्ये स्थावर मालमत्तेचाही समावेश केला आहे. इमारती, प्राणी, वाहने यांचाही समावेश आहे. तसेच कंपन्यांमधील शेअर्स, बँक आणि पोस्टातील गुंतवणूक यांचाही समावेश आहे.

Advertisement

जानेवारी ते डिसेंबर 2019 या काळात हा सर्वे केला होता. या सर्वेनुसार ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांकडे 274 लाख कोटी रुपये संपत्ती असल्याचे दिसून आले. यामध्ये 10 टक्के लोकांकडेच निम्मी संपत्ती असल्याचे दिसून आले. या सर्वेत देशातील 5 हजार 940 गावांतील 69 हजार 445 कुटुंबे आणि शहरी भागातील 3 हजार 995 ब्लॉकमधील 47 हजार कुटुंबांचा समावेश केला होता.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply