Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. त्यामुळे तालिबानी सुद्धा घाबरलेत; म्हणून जगाला केलेय ‘हे’ महत्वाचे आवाहन

नवी दिल्ली : अफगाणिस्तान मध्ये तालिबानचे सरकार आहे. तालिबानने देशावर कब्जा मिळवला असला तरी आता देश चालवायचा कसा, हा मोठा प्रश्न आहे. कारण, तालिबान सध्या कंगाल आहे आणि अनेक जागतिक निर्बंधही आहेत. या दुहेरी संकटात तालिबान अडकला आहे. त्यामुळे तालिबान्यांना आता वेगळीच भिती सतावत आहे. सध्याच्या कारवाया पाहता आणखी निर्बंध लादले गेले तर परिस्थिती आणखी बिकट होईल. या संभाव्य संकटाचा अंदाज आल्याने सध्याचे निर्बंध हटवण्यात यावेत, असे आवाहन तालिबानने आंतरराष्ट्रीय समुदायास केले आहे.

Advertisement

एरियाना वृत्तसंस्थेनुसार, देशाच्या विकासात मदत करण्यासाठी देशाबाहेर गेलेल्या अफगाण नागरिकांनी पुन्हा स्वदेशात यावे, असे आवाहन विदेश मंत्र्यांनी केले आहे. तसेच तालिबान सरकार अमेरिकेसह जगातील सर्वच देशांबरोबर काम करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. तालिबानने मागील आठवड्यात सरकार गठीत केले आहे. विशेष म्हणजे, या सरकारमध्ये जागतिक दहशतवाद्यांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिकेच्या यादीत आंतकवादी म्हणून घोषित असलेल्या काही जणांचा या सरकारमध्ये समावेश आहे. तालिबानच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा असे अनेक लोक आहेत जे संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिबंध यादीत समाविष्ट आहेत.

Advertisement

अशा सरकारकडून सध्या देशाचा कारभार चालवला जात आहे. तालिबान समोर सध्या पैशांचे संकट असले तरी चीन आणि अमेरिकेने मदत देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पैशांची अडचण काही प्रमाणात मिटणार आहे. भविष्यात आणखी मदत पाहिजे असेल तर तालिबानच्या वर्तणुकीवर सर्व काही अवलंबून आहे. प्रतिबंधांच्या बाबतीत सुद्धा तसेच आहे. त्यामुळे भविष्यात या गोष्टींचा विचार करूनच जगातील देश याबाबत निर्णय घेणार आहेत. अमेरिकेने तर मदतीची घोषणा करतानाच हे स्पष्ट केले आहे. आता तालिबान काय धोरण घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply