Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ‘त्या’ ठिकाणी चीन होणार शंभर टक्के फेल; ‘त्या’ अहवालाने चीनबद्दल सांगितलेय ‘असे’ काही..

बीजिंग : आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात नेहमीच वाद उकरुन काढणारा चीन सध्या जगासाठी डोकेदुखी ठरत आहे. चीनच्या वाढत्या कारवायांनी अनेक देश हैराण झाले आहेत. मात्र, चीनची सातत्याने वाढणारी सैन्य ताकत पाहता कुणीही देश चीनच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न सहसा करत नाही. इतकेच काय तर जागतिक महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेने सुद्धा चीनला थेट आव्हान देणे नेहमीच टाळले आहे. असे असले तरी शक्य असेल त्या पद्धतीने चीनला टार्गेट करण्याची संधी मात्र अमेरिका सोडत नाही.

Advertisement

आताही चीनला त्रास देण्याच्या उद्देशाने अमेरिकेच्या एका मासिकात एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. चिनी सैन्य जास्त उंचावरील ठिकाणी युद्ध लढू शकत नाही, अशा आशयाचा अहवाल नॅशनल इंटरेस्ट या मासिकाने प्रसिद्ध केला आहे.

Advertisement

चीनकडे अत्याधुनिक हत्यारे आहेत. मात्र, जास्त उंचावरील ठिकाणी युद्ध सुरू झाल्यास या ठिकाणी शस्त्रास्त्रे पोहोच करणारी यंत्रणा चीनकडे नाही. त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली तर चिनी सैन्य युद्ध करू शकणार नाही, असे या अहवालात म्हटले आहे. चीनकडे Z-8 कार्गो हेलिकॉप्टर्स आहेत. मात्र, चिनूक हेलिकॉप्टरच्या तुलनेत त्यांची क्षमता निम्मी सुद्धा नाही. चिनी हेलिकॉप्टर्स 20 हजार पाऊंड्सपर्यंत वजन उचलू शकतात. त्यातुलनेत चिनूक हेलिकॉप्टर 50 हजार पाऊंड्सपर्यंत वजन उचलू शकतात. त्यामुळे शस्त्रांची ने-आण करणे चीनसाठी जास्त कठीण काम आहे.

Advertisement

अमेरिकी मासिकाच्या या अहवालावर अद्याप चीनने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, चीन प्रतिक्रिया देणार नाही असे होणार नाही. याआधीही अनेक वेळ चीन आणि अमेरिकेत अनेक मुद्द्यांवर वाद झाला आहे. त्यावेळी चीनने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आता तर अमेरिकेने चीनच्या दृष्टीने त्रासदायक ठरणाऱ्या मुद्द्यांना टार्गेट करणे सुरू केले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता चीन काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply