Take a fresh look at your lifestyle.

म्हणून गुगलला बसलाय ‘तिथे’ही झटका; चक्क 1300 कोटींचा लागलाय बांबू..!

मुंबई : भारत देशातील स्पर्धा आयोग नावाची संकल्पना नेमकी काय करते अशीच परिस्थिती आहे. फेसबुक, गुगल, रिलायन्स, अदानी ग्रुप आणि अनेक इतर कंपन्या दणक्यात स्पर्धा मोडीत काढण्याच्या प्रयत्नात यशस्वी होत असताना आपल्याकडे सगळी सामसूम आहे. नव्हे, काही ठिकाणी तर सरकारी यंत्रणा या कंपन्यांना पायघड्या टाकीत आहे. अशावेळी दक्षिण कोरियाच्या स्पर्धा आयोगाने मोबाईल ऑपरेटिंग सिस्टममधील वर्चस्वाचा गैरवापर केल्याबद्दल गुगलला 1,305 कोटी रुपये (207.4 अब्ज वोन) दंड ठोठावला आहे. ही त्या देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी अविश्वासाची शिक्षा (एंटीट्रस्ट दंड) असल्याचे मानले जाते.

Advertisement

दक्षिण कोरिया सुधारित दूरसंचार कायद्याची अंमलबजावणी करत असताना या दंडाची घोषणा करण्यात आली. या अंतर्गत Google आणि Apple सारखे अॅप मार्केट ऑपरेटर स्मार्टफोन वापरकर्त्यांना त्यांच्या अॅप-मधील खरेदी प्रणालीद्वारे पैसे देण्यास भाग पाडू शकणार नाहीत. तथापि, असे सांगितले जात आहे की गुगल या दंडाविरोधात अपील करणार आहे. 2013 मध्ये सॅमसंगला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. कारण, गूगलने गॅलेक्सी गियर स्मार्टवॉचमध्ये त्याच्या सॉफ्टवेअरची सानुकूलित आवृत्ती वापरण्यास प्रतिबंध केला होता.

Advertisement

यामुळे सॅमसंगने टिझन नावाच्या छोट्या ऑपरेटिंग सिस्टमकडे आपला मोर्चा वळवला. परंतु अनुप्रयोगांच्या अभावामुळे ते नाद सोडून द्यावे लागले. यानंतर आता कंपनीच्या नवीन स्मार्टवॉचमध्ये गुगलची वेअर ऑपरेटिंग सिस्टीम वापरण्यात आली आहे. त्याच धर्तीवर स्मार्ट स्पीकर्स रिलीज करण्यापासून गुगलने एलजीलाही रोखले होते. गुगल कंपनी अशा पद्धतीने अनेक कंपन्यांना पायदळी तुडवण्याचा उद्योग करीत असल्याचे आरोप अनेकदा होत असतात.

Advertisement

दक्षिण कोरियन फेअर ट्रेड कमिशनचे अध्यक्ष जोह सुंग-वूक यांच्या मते, गुगल 2011 पासून आपल्या इलेक्ट्रॉनिक भागीदारांना एंटी-फ्रैग्मेंटेशन करारांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडत बाजारातील स्पर्धेत अडथळा आणत आहे. यामुळे कंपन्यांना लागणारी सुधारित ऑपरेटिंग सिस्टीम स्मार्टफोन किंवा स्मार्टवॉचमध्ये टाकण्यास गुगलने प्रतिबंध केला. परिणामी, मोबाईल सॉफ्टवेअर आणि अॅप बाजारात गुगलने सहज वर्चस्व गाजवले. सॅमसंग आणि एलजीसारख्या उत्पादकांना अॅप स्टोअर परवाना किंवा संगणक कोडमध्ये जलद प्रवेशासाठी Google सह करार करताना त्याच्या अटी मान्य कराव्या लागल्या. जेणेकरून या कंपन्या Google ला त्याच्या Android किंवा इतर ऑपरेटिंग सिस्टीमची नवीन आवृत्ती रिलीज करण्यापूर्वी त्यांचे डिव्हाइस अगोदरच तयार करू शकतील.

Advertisement

Advertisement

Leave a Reply