Take a fresh look at your lifestyle.

शहरी भागातही नवीन स्वस्त धान्य दुकाने सुरु होणार, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय..

मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात निर्माण झालेली परिस्थिती, तसेच जुलै व ऑगस्टमध्ये ठिकठिकाणी अतिवृष्टी झाल्याने महाराष्ट्राती गरीब, गरजू लोकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातही शहरी भागातील अशी लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे शहरी भागातही नवीन रास्त भाव धान्य दुकाने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

Advertisement

स्वस्त धान्य दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ करण्याकरिता, रास्त भाव दुकानांची पुर्नरचना करण्याबाबतची कार्यवाही राज्य शासनाने यापूर्वीही केली होती, मात्र या कार्यवाहीला लागणारा कालावधी लक्षात घेता, २०१८ मध्ये शहरी भागात नवीन दुकाने वितरणाच्या जाहिरनाम्यास स्थगिती देण्यात आली होती. आता ही स्थगिती उठविण्यात आली आहे. त्यामुळे आता शहरी भागातही स्वस्त धान्य दुकाने सुरू करण्यात येणार आहेत.

Advertisement

कोरोना संसर्गाने गरीब लोकांचे मोठे हाल झाले. त्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. असे संकट आलेच, तर या काळात रास्त भाव दुकानांमार्फत राज्यातील गोरगरीब जनतेला अन्नधान्य, राॅकेल वाटपाचे महत्त्वपूर्ण कार्य चालू ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच राज्यात जुलै व ऑगस्टमध्ये पावसामुळे अनेक शहरांत पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

Advertisement

शहरी भागातील अनेक ठिकाणी नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. अशा वेळी तेथे सरकारी मदत अन्नधान्याच्या स्वरूपात रास्त भाव दुकानदारांच्या माध्यमातून देणे अनिवार्य असून, शहराची मूळ परिस्थिती पूर्वपदावर आणणे, ही शासनाची जबाबदारी ठरते, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

Advertisement

PM मोदींनी घेतली मंत्र्यांची शाळा; पहा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर काय सूचना केल्यात
म्हणून मुजफ्फरनगरमध्ये 168 वर्षांपासून सुरू आहे चक्की पिसिंग.. पिसिंग.. & पिसिंग..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply