Take a fresh look at your lifestyle.

‘द फॅमिली मॅन’सारखा रचला होता दहशतवादी कट; पोलिसांनी केला उध्वस्त….वाचा काय होता प्लॅन…

आपल्या देशात सर्वाधिक चर्चेत असलेल्या 'द फॅमिली मॅन' वेब सीरीजमध्ये पाकिस्तानी षडयंत्राबद्दल आणि त्याला प्रत्युत्तरादाखल भारतीय गुप्तचर विभागाने केलेल्या कारवायांबद्दल भाष्य केले आहे.

दिल्ली : तुम्ही ‘द फॅमिली मॅन’ वेब सीरीज पाहिली असेल तर तुम्हाला पाक करत असलेल्या नापाक हरकतींविषयी अंदाज आलेला असेल. सर्वाधिक प्रेक्षकांच्या पसंतीला असलेल्या या फॅमली मॅन वेब सीरीज सारखाच कट सध्या आपल्या देशात घडवून खळबळ उडवून दिली जाणार होती. मात्र द फॅमिली मॅनमधील श्रीकांतची भुमिका बजावत पोलिसांनी हा कट उधळला.

Advertisement

आपल्या देशात सर्वाधिक चर्चेत असलेल्या ‘द फॅमिली मॅन’ वेब सीरीजमध्ये पाकिस्तानी षडयंत्राबद्दल आणि त्याला प्रत्युत्तरादाखल भारतीय गुप्तचर विभागाने केलेल्या कारवायांबद्दल भाष्य केले आहे. तर त्या वेब सीरीजमध्ये 26/11 च्या हल्ल्यापेक्षा मोठा हल्ला घडवण्याचे नियोजन त्यामध्ये दाखवले होते. अगदी त्याप्रमाणे पाकिस्तान भारतात घातपात करण्याविषयी योजना आखत होता. तर त्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयने दाऊदसोबत मोठा कट रचला होता. त्यासाठी त्यांनी दोन गट तयार केले होते. तर वेबसीरीजच्या मुसाप्रमाणे 2 दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. तर या मालिकेतील हल्ल्याची कथा मुंबई-बलुचिस्तान-पाकिस्तान-सीरीया-काश्मीर ते दिल्लीपर्यंत पोहचते. तर दिल्लीत अटक केलेल्या दहशतवाद्यांची कथा दिल्लीहून-लखनऊ-उत्तरप्रदेश-मस्तकमार्गे पाकिस्तानपर्यंत पोहचते.

Advertisement

‘द फॅमिली मॅन’ वेब सीरीजमध्ये ज्याप्रमाणे श्रीकांत (मनोज वाजपेयी) गुप्तचर यंत्रणेत काम करतात. तसेच साध्या मार्गाने अचंबित करणाऱ्या गोष्टी साध्य करून दहशतवादी असलेल्या मुसाने आखलेला कट उधळून लावतो. तसाच दिल्ली पोलिसांच्या विशेष सेल आणि पोलिसांनी इतर 3 राज्यामधून अत्यंत 6 दहशतवाद्यांना अटक केली.  त्यात पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दोन दहशतवाद्यांचा सामावेश आहे. तर या ऑपरेशनसाठी आयएसआयने दाऊद इब्राहिमच्या टोळीसह दोन भागांमध्ये दहशतवादी हल्ल्याची योजना आखली होती. या हल्ल्याच्या योजनेत दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमची महत्वाची भुमिका होती. त्याच्याकडे दहशतवाद्यांना शस्रे आणि स्फोटके पोहचवण्याचे काम तसेच हवाला पध्दतीने पैसे उपलब्ध करून देण्याचे काम सामाविष्ट होते. तर आयएसआय भारतात कोठे हल्ले केले जातील आणि हल्ल्यात कोणत्या लोकांना टार्गेट करायचे आहे, त्याची ओळख करण्याचे काम आयएसआयकडे होते. याबरोबरच आयएसआय हल्ल्यापुर्वी आईडी ठेवण्याचे काम करणार होती.

Advertisement

दहशतवाद्यांनी चार राज्यात यासंदर्भातील ऑपरेशन सुरू केले होते. तर दिल्ली पोलिसांनी मंगळवारी जान मोहम्मद शेख(47) उर्फ समीर (मुंबई सायनचा रहिवासी), ओसामा (22)  जामिया नगरचा रहिवासी, मुलचंद (47), रायबरेलीचा रहिवासी झीशान कमर(28) यांना अटक केली. तर प्रयागराज, बहराईच.के.मोहम्मद अबू बकर (23) आणि लखनऊचा मोहम्मद अमीर जावेद (31) यांना दिल्ली आणि उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी छापा टाकून अटक केली.  या सगळ्या दहशतवाद्यांना अटक करण्यासाठी बहुराज्यातील पोलिसांनी एकत्र येत कारवाई केली. यातील मोहम्मद ओसामा ओखला, मोहम्मद अबू बकर, सराय काले खान, प्रयागराज येथून झीशान, लखनऊ येथून मोहम्मद अमीर जावेद आणि रायबरेली येथून हवाला ऑपरेटर मूलचंद यांच्या मुसक्या आवळल्या. 

Advertisement

द फॅमिली मॅन वेब सीरीजमध्ये ज्याप्रकारे दहशतवादी असलेला मुसा आणि इतर दहशतवादी सीरीयामध्ये प्रशिक्षण घेतात त्याच प्रकारे 22 वर्षीय ओसामा उर्फ सामी आणि मंगळवारी दिल्लीत जामियानगर येथून अटक करण्यात आलेला संशयीत आणि प्रयागराज येथून अटक करण्यात आलेला 28 वर्षांचा झीशान कमर पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेऊन आला होता. तर तो 22 एप्रिलला सलाम एअरच्या विमानाने लखनऊहून मस्तकला पोहचला होता. मात्र भारतीय गुप्तचर विभागाचे काही एजंट ओसामावार नजर ठेऊन होते. तर ओसामा मस्तकला  पोहचल्यावर त्याने झीशान कमर याची भेट घेतली. त्यांच्यासोबत 15-16 बांग्लादेशी लोक होते. त्यांना दोन गटात विभागण्यात आले. पुढे ओसामा आणि झीशान एका गटात राहुन त्यांनी त्या लोकांना पाकिस्तानातील सिंध प्रांतात नेले. तेथे लेप्टनंट दर्जाच्या अधिकाऱ्याने त्यांना प्रशिक्षण दिले. 

Advertisement

दहशतवाद्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितले की, गर्दीच्या ठिकाणी स्फोट करण्याची त्यांची योजना होती. तर उत्तरप्रदेशात होणाऱ्या निवडणूकांनाही टार्गेट करण्यात येणार होते. तर निवडणूकांची रॅली आणि नवरात्रीसह येत्या काळातील सणांच्या वेळी मोठ्या प्रमाणात स्फोट घडवून आणण्याचा त्यांचा विचार होता. मात्र महाराष्ट्राव्यतिरीक्त दहशतवाद्यांनी दिल्ली आणि उत्तरप्रदेशात अनेक ठिकाणी पुर्ण तयारी केली होती. मात्र फॅमिली मॅनमधील मनोज वाजपेयींच्या भुमिकेसारखी भुमिका दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानेे घेतली आणि दहशतवाद्यांचा कट उधळला.

Advertisement
Advertisement

Leave a Reply