Take a fresh look at your lifestyle.

खुशखबर..! ‘त्या’ कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी…वाचा कोणाला होणार फायदा…

कोरोना महामारीच्या काळात जानेवारी 2020 पासून जून 2021 पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. तसेच त्यांच्या वेतनातही वाढ केली गेली नव्हती. त्यामुळे त्यांना आपले आर्थिक बजेट सावरतांना मोठी कसरत करावी लागत होती.

दिल्ली : कोरोनामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये कपात करण्यात आली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले होते. घरगुती खर्चापासून ते बँकेचे, घराचे, गाड्यांचे हप्ते भरतांना नाकीनऊ आले होते. मात्र आता सणासुदीच्या पार्श्वभुमीवर सरकारने त्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर दिली आहे.

Advertisement

कोरोना महामारीच्या काळात जानेवारी 2020 पासून जून 2021 पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. तसेच त्यांच्या वेतनातही वाढ केली गेली नव्हती. त्यामुळे त्यांना आपले आर्थिक बजेट सावरतांना मोठी कसरत करावी लागत होती. मात्र केंद्र सरकारने 1 जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल 28 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. तर वेतनातही वाढ केली होती. त्यासोबत इतर भत्त्यांमध्येही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Advertisement

केंद्रीय मंत्रीमंडळाने घरभाडे भत्त्यातही 11 टक्के वाढ केली आहे. त्याचा फायदा केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. त्यामुळे महागाई भत्त्यापाठोपाठ डीआरमझ्ये 11 टक्के वाढीच्या प्रस्तावाला मंजूरी दिली होती. त्यामुळे या भत्ता वाढीचा केंद्र सरकारच्या 48 लाखांपेक्षा जास्त कर्म(HRA) घसघशीत वाढ होऊन 27 टक्के करण्यात आला आहे. तसेच डीआर, डीएत वाढीपाठोपाठ एचआरएमध्येही वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली आहे.

Advertisement

या एचआरए मध्ये वेगवेगळ्या वर्गासाठी 1-2 टक्क्यांची वाढ केली गेली आहे. याबाबत अर्थ मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना शहरांनुसार 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के एचआरए मिळणार आहे. तर तीन्ही वर्गांसाठी 24 टक्के, 18 टक्के आणि 8 टक्के इतका एचआरए मिळणार आहे. तर 5400, 3600 आणि 1800 रूपये असा तीन्ही वर्गांचा किमान एचआरए असणार आहे.

Advertisement

केंद्र सरकारने जारी केलेल्या नोटीफिकेशननुसार सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना एचआरएचा लाभ घेता येतो. तसेच महागाई भत्त्याप्रमाणे एचआरए ठरवला जातो. मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारे पायाभुत वेतन जर 56000 रूपये असेल तर त्या कर्मचाऱ्यांना प्रति महिना 27 टक्के एचआरए मिळेल.

Advertisement
Advertisement

Leave a Reply