Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाने ‘आम आदमी’ सरकारला दिलाय ‘असा’ झटका; त्यामध्ये 23 टक्के कमी पडलेत; पहा, आता काय आहे सरकारचा पुढील प्लान

नवी दिल्ली : कोरोना देशात दाखल होऊन आता दोन वर्षे होत आली आहेत. या काळात देशाचे मोठे नुकसान झाले आहे. लाखो लोकांचे रोजगार गेले. उद्योग व्यवसायांना टाळे लागले. अर्थव्यवस्थेचेही नुकसान झाले. राज्यांनाही मोठा झटका बसला आहे. राजधानी दिल्लीचा महसूल तर 23 टक्क्यांनी घटला आहे. सन 2020-21 मध्ये अर्थसंकल्पात जो अंदाज व्यक्त केला होता त्यातुलनेत 41 टक्के कमी महसूल मिळाला. 2021-22 मध्ये अर्थसंकल्पाचा जो अंदाज आहे त्यातुलनेत 23 टक्के अजूनही कमीच आहेत. विशेष म्हणजे, कोरोनाची परिस्थिती पाहता यावर्षात मागील वर्षापेक्षाही कमी महसूल मिळेल, असे अपेक्षित होते.

Advertisement

दिल्ली सरकारने सध्या कर्मचाऱ्यांचे पगार आणि कोविड संबंधित खर्च वगळता अन्य प्रकारच्या खर्चांवर निर्बंध आणले आहेत. नवीन अबकारी धोरणानुसार जवळपास दोन ते अडीच हजार कोटी महसूल मिळेल असे अपेक्षित होते. आता मात्र पुढील वर्षभरात साडेतीन हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सांगितले.

Advertisement

कोरोनाच्या लॉकडाऊन काळात आर्थिक घडामोडी जवळपास बंद होत्या. त्यामुळे कमी महसूल मिळाला आहे. व्हॅट अंतर्गत या आर्थिक वर्षात 25 टक्के कमी महसूल मिळाला. तर उत्पादन शुल्काच्या माध्यमातून 30 टक्के कमी महसूल मिळाला. या आर्थिक वर्षात स्टॅम्प ड्यूटी आणि मोटार वाहन कर सुद्धा अनुक्रमे 16 टक्के आणि 19 टक्क्यांनी कमी झाला आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply