Take a fresh look at your lifestyle.

… तर पेट्रोल आणि डिझेलचे दर 25 रुपयांनी होतील कमी; केंद्र सरकार तो निर्णय घेणार ?

नवी दिल्ली : देशात इंधनाच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. पेट्रोलच्या किमती तर शंभरच्याही पुढे गेले आहे. तरी देखील सरकारने दिलासादायक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला नाही. आता मात्र इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी देखील सरकारच्या निर्णयावरच इंधनाचे भवितव्य राहणार आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याबाबत चर्चा विचार केला जाईल. याबाबत सकारात्मक निर्णय घेतला गेला तर पेट्रोलच्या किमती 75 रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात.

Advertisement

सध्या देशात इंधनाच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. या दरवाढीमुळे देशांतर्गत महागाईत सुद्धा वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. आता तर पेट्रोल शंभरच्याही पुढे गेले आहे. त्यामुळे या किमती कमी करण्याची मागणी सातत्याने होत आहे. तरी देखील सरकारने तसा निर्णय घेतलेला नाही. मध्यंतरी काही प्रमाणात दर कमी झाले होते. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

Advertisement

अजूनही देशभरात इंधनाच्या किमती जास्तच आहेत. पेट्रोल आणि डिझेल जीएसटी अंतर्गत आणले दर कमी होतील असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने आता तसा विचार सुरू केला आहे. शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा होईल. मात्र, हा निर्णय होईलच याची शाश्वती नाही.

Advertisement

कारण, इंधनावरील कर हे राज्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे राज्ये यास विरोध करण्याची शक्यता आहे. पेट्रोल व डिझेल जीएसटीच्या कक्षेत आल्यास दर कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल. जीएसटीवरील मंत्र्यांचे पॅनेल पेट्रोलियम उत्पादनांवर राष्ट्रीय पातळीवर एक कर लावण्याचा विचार करू शकते. मात्र, या मुद्द्यावर राज्य सरकारांचे प्रतिनिधी काय म्हणतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राज्य सरकारांनी सकारात्मक विचार केला तर दर कपातीबाबत मोठा निर्णय होऊ शकतो.

Advertisement

 

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply