Take a fresh look at your lifestyle.

आज पुन्हा सोने आणि चांदीचे भाव पडले; पहा, काय आहे सोने मार्केटमधील परिस्थिती

मुंबई : सोने आणि चांदीचे दर काही दिवसांपासून कमी होत आहेत. आज बुधवारी सुद्धा या धातूंच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले. आज सोने आणि चांदीचे दर पुन्हा कमी झाले आहेत. त्यामुळे सध्या तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर फायदेशीर ठरणार आहे.

Advertisement

आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज मध्ये सोन्याच्या वायदे दरात 75 रुपयांची कपात झाली. त्यामुळे सध्या सोन्याचे दर 47 हजार 185 रुपये प्रति दहा ग्रॅम असे आहेत. याआधीच्या सत्रात सोन्याचे दर 47 हजार 260 रुपये असे होते. चांदीच्या दरात सुद्धा घसरण झाली आहे. चांदीचे वायदे दर 187 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे सध्या एक किलो चांदीचे दर 63 हजार 398 रुपये असे आहेत.

Advertisement

देशात सध्याच्या परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत आहेत. कधी कमी तर कधी जास्त असा ट्रेंड सुरू आहे. यामुळे सोन्याचे दर बरेच कमी झाले आहेत. एक वेळी असे वाटत होते की सोने 50 हजारांच्या पुढे जाईल. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोने 56 हजारांच्याही पुढे गेले होते.

Advertisement

त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे यावेळी सुद्धा सोने 50 हजरांच्या पुढे जाईल असे वाटत होते. त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला. राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे.

Advertisement

दरम्यान, आता सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे सोन्यास मागणी वाढण्याची शक्यता आहे. साधारण ऑक्टोबर महिन्यात मागणीत वाढ होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. असे घडले तर सोन्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply