Take a fresh look at your lifestyle.

बालपणीच्या गाण्यातील रेल्वे इंजिन भंगारात…जाणून घ्या कारण…

60 च्या दशकात भारतात प्रवेश केलेल्या या इंजिनने त्या काळात भारतात धिंगाणा घातला होता. कारण या इंजिनचा वेग 120 किमी/तास होता. तर त्याची क्षमता आडीच हजार अश्वशक्ती इतकी प्रचंड होती. तर आधीच्या रेल्वे इंजिनच्या तुलनेत या हे इंजिन दुप्पट क्षमतेचे होते

दिल्ली : लहानपणी विविध गाण्यांच्या माध्यमातून रेल्वेचं गुणगाण गायलं जायचं. झुक झुक झुक झुक आगनगाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी, पळती झाडे पाहुया, मामाच्या गावाला जाऊया… अशा प्रकारची कविता गुणगुणली जायची. त्या कवितेतून लहानपणी मामाच्या गावाला जाण्याच्या आठवणी जागवल्या जायच्या. मात्र आता मामाच्या गावाला जाणारे रेल्वे इंजिनचं इतिहासजमा होणार आहे.

Advertisement

तुम्ही अनेकवेळा रेल्वेने प्रवास करतांना प्रवासादरम्यान रेल्वेच्या डिझेल इंजिन प्रकारातील डब्ल्यूडीएम2 (WDM2) पाहिले असेल. हे इंजिन आतापर्यंतचे सर्वात यशस्वी रेल्वे इंजिन मानले जाते. तर 60 च्या दशकात भारतात प्रवेश केलेल्या या इंजिनने त्या काळात भारतात धिंगाणा घातला होता. कारण या इंजिनचा वेग 120 किमी/तास होता. तर त्याची क्षमता आडीच हजार अश्वशक्ती इतकी प्रचंड होती. तर आधीच्या रेल्वे इंजिनच्या तुलनेत या हे इंजिन दुप्पट क्षमतेचे होते. त्यामुळे तेव्हा तात्कालिन सरकारने ठरवले होते की, या प्रकारचे इंजिन आपल्याच देशात बनवले जावेत. कारण रेल्वे इंजिनबाबत भारताला इतर देशांवर अवलंबून रहावे लागू नये. तर या वेगाने धावणाऱ्या रेल्वेच्या प्रवासाला त्याकाळात  विशेष पसंती होती. मात्र आता हेच इंजिन इतिहासजमा होणार आहे. त्यामुळे मामाच्या गावाला जातांना धुरांच्या रेषा हवेत सोडणाऱ्या गाण्यातील रेल्वे इंजिनला पुढची पीढी मुकणार आहे.

Advertisement

रेल्वे मंत्रालयाने घोषणा करताना म्हटले की, येत्या काळात मोठ्या लाईनवर फक्त इलेक्ट्रिक इंजिनच चालतील. त्यामुळे हळूहळू सब-लार्जच्या रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करण्यात येत आहे. तर इलेक्ट्रिक इंजिनवर रेल्वे चालायला सुरूवात झाल्यानंतर हे स्पष्ट आहे की, डिझेलवर चालणाऱ्या लोकोमोटिव्ह टप्प्याटप्प्याने बंद केले जातील. त्यामुळे हे इंजिन इतिहासजमा होणार आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply