Take a fresh look at your lifestyle.

ओला कंपनीच्या निर्णयाचे जोरदार स्वागत; पहा नारीशक्तीला कसा सलाम केलाय त्यांनी

दिल्ली : ओला.. भारतातील सर्वात मोठी प्रवासी वाहतूक कंपनी.. आता या कंपनीची ऑटो मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरही आली आहे. ओला’ने काही दिवसांपूर्वीच त्यांची ई-स्कूटर सादर केली हाेती. त्याच्या ऑनलाईन बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला हाेता. ओला कंपनीचा तमिळनाडूमध्ये सर्वात माेठा कारखाना आहे.

Advertisement

तमिळनाडूस्थित ओला कंपनीच्या ई-स्‍कूटरच्या प्लान्टची संपूर्ण धूरा महिलांच्या हाती सोपवण्याचा निर्णय कंपनीचे सहसंस्थापक भाविश अग्रवाल यांनी घेतला आहे. त्यामुळे भारतातील एका मोठ्या कंपनीचे नेतृत्व महिलांच्या हाती आले आहे. यासंदर्भात भाविश अग्रवाल यांनी वैयक्तीक ट्विटरवरुन ही माहिती दिली. “आत्मनिर्भर भारत योजनेच्या उद्देशाने ओला कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपूर्णपणे 10 हजार महिलांद्वारा संचलित होणारा जगातील तमिळनाडूचा पहिला प्लान्ट असेल,” असे अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

Advertisement

तमिळनाडूतील या प्लान्टसाठी ओला कंपनी 2400 कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही कंपनी वर्षाला 10 लाख ई-स्‍कूटरची निर्मिती करणार असून, या हेतूनेच या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, भारताला जगातील मॅन्युफॅक्चरिंग हब बनविण्यासाठी आम्ही हा प्रकल्प महिलांवर सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांच्या पहिल्या बॅचसोबत फोटो शेयर करीत भाविश अग्रवाल यांनी प्लांटमध्ये तयार होणाऱ्या प्रत्येक वाहनासाठी महिला जबाबदारीने काम करतील, अशी आशा व्यक्त केली आहे.

Advertisement

जीडीपीला २७ टक्क्यांचा हातभार
एका रिपोर्टचा संदर्भ देत, भाविश अग्रवाल यांनी महिलांच्या या सहभागामुळे देशाच्या GDP मध्ये 27 टक्क्यांचा हातभार लागेल, असे म्हटले आहे. सध्या देशात ई-स्कूटर्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक कंपन्यांनी ई-स्कूटर्स बाजारात आणल्या आहेत. त्यात महिलांच्या माध्यमातून ओला कंपनीने आघाडी घेतल्याचे दिसत आहे.

Advertisement

अमेरिका पाकिस्तानला ‘असा’ देणार झटका; पहा, बायडेन प्रशासन कोणता निर्णय घेण्याच्या तयारीत
पाकिस्तानने केली मोठीच आगळीक; पहा मोदींशी थेट पंगा घेण्यासाठी कोणता मुद्दा उकरलाय आता

Advertisement
Advertisement

Leave a Reply