Take a fresh look at your lifestyle.

भारत-पाक नवा वाद : पहा नेमका काय आहे जुनागडचा मुद्दा; गुजरातमध्येही ना’पाक’ नजरा रोखल्या..!

मुंबई : पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संस्था आयएसआयने पंजाब आणि काश्मीरनंतर आता फुटीरतावादाला गुजरातच्या जुनागढमध्येही नेण्याची तयारी केली आहे. आयएसआयचे कट्टर समर्थक आणि जुनागढचे कथित नवाब मोहम्मद जहांगीर खानजी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना काश्मीरप्रमाणे जुनागढचे ‘दूत’ बनण्याचे आवाहन करून खान यांनी सर्व आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या कब्जामधील जुनागढच्या कथित स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करावा असे आवाहन केले आहे.

Advertisement

यापूर्वी पाकिस्तानने आपला नवा राजकीय नकाशा जारी केला होता. याद्वारे पाकिस्तानने ज्या क्षेत्रांवर भारताशी वाद आहे त्यावर आपला दावा मांडण्याचा प्रयत्न केला होता. या नकाशात पाकिस्तानने खुलेआम काश्मीर, सियाचिनवर दावा करतानाच गुजरातच्या काही भागांवरही आपला दावा केला आहे. अगदी जुनागढ आणि मनवदार यावरही हक्क सांगितला आहे. 1948 मध्ये जनमत चाचणीनंतर भारतामध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली हे विलीनीकरण झाले होते. तो भागही पाकिस्तानच्या नकाशावर दाखवले गेला आहे. असे मानले जाते की समुद्राशी निगडीत या भागांच्या संपत्तीवर पाकिस्तानचा डोळा आहे, म्हणून त्यांनी असे पाऊल उचलले आहे. त्यात आता ही नवी बातमी आल्याने खळबळ उडाली आहे.

Advertisement

नेमका मुद्दा : जम्मू-काश्मीर आणि हैदराबाद वगळता गुजरातमधील जुनागडने 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य होईपर्यंत भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला नव्हता. जुनागढमध्ये सुमारे 80 टक्के हिंदू लोकसंख्या होती आणि भारत सरकार जुनागढचे नवाब मोहम्मद महाबत खानजी (तिसरे) यांना भारतात सामील करून घेण्याचा प्रयत्न करत होते. पण ते यासाठी तयार नव्हते. त्यांनी 15 सप्टेंबर 1947 रोजी पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे जुनागढचे लोक संतप्त झाले आणि राज्याच्या अनेक भागांमध्ये नवाबांच्या राजवटीच्या विरोधात लोक उभे राहिले. यामुळे नवाब आपल्या कुटुंबासह कराचीला पळून गेला.

Advertisement

त्यानंतर सरदार पटेल यांनी पाकिस्तानला जुनागडच्या विलीनीकरणाची मान्यता रद्द करून जनमत घेण्यास सांगितले. जेव्हा पाकिस्तानने नकार दिला तेव्हा सरदार पटेल यांनी 1 नोव्हेंबर 1947 रोजी भारतीय सैन्य जुनागढला पाठवले. त्यानंतर त्याच वर्षी डिसेंबरमध्ये सार्वमत घेण्यात आले. ज्यामध्ये 99 टक्के लोकांनी भारतात राहणे पसंत केले. असे असूनही आता अचानक पाकिस्तानने आता ते आपल्या नकाशामध्ये समाविष्ट केले आहे. जम्मू-काश्मीरमधील भागात त्यावेळी अशी जनमत चाचणी झाली नसल्याचा मुद्दा पुढे करणाऱ्या पाकिस्तानने आता जुनागड मुद्द्यावर मात्र तत्कालीन जनमत चाचणी केल्याच्या मुद्द्याकडेच कानाडोळा करून नवी कुरापत काढण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply