Take a fresh look at your lifestyle.

अमेरिका पाकिस्तानला ‘असा’ देणार झटका; पहा, बायडेन प्रशासन कोणता निर्णय घेण्याच्या तयारीत

वॉशिंग्टन : अफगाणिस्तान मध्ये तालिबान्यांना राजरोसपणे मदत करणारा पाकिस्तान आता अमेरिकेच्या रडारवर आला आहे. सध्या अफगाणिस्तान मधील चीन आणि पाकिस्तानच्या कारवायांमुळे तालिबानला पाठबळ मिळत आहे. त्यामुळेच आता अमेरिकेने पाकिस्तानला धडा शिकवण्याचा विचार सुरू केला आहे. अमेरिकेचे विदेश मंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी सांगितले, की मागील वीस वर्षांच्या काळातील पाकिस्तानचे कामकाज तपासण्यात येणार आहे. तसेच गैर नाटो सहकारी म्हणून पाकिस्तानला मिळालेला दर्जा रद्द करण्याचीही मागणी आता होत आहे. असा निर्णय घेतला गेला तर पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत.

Advertisement

तालिबानला पूर्ण संरक्षण तसेच मदत करण्याचे काम पाकिस्तानने केले आहे. पाकिस्तानच्या या कारवायांनी अमेरिकेचे संसद सदस्य नाराज झाले आहेत. त्यामुळे बायडेन प्रशासनानेही या देशाच्या दुटप्पी धोरणाची तपासणी केली जाईल. तसेच गरज वाटल्यास कारवाई सुद्धा केली जाईल, असे आश्वासन या सदस्यांना दिले आहे. त्यामुळे अमेरिकेचे राज्यकर्ते सध्या पाकिस्तानबाबत काय विचार करत आहेत, याचा अंदाज येतो.

Advertisement

डेमोक्रेटिक पक्षाचे संसद सदस्य जोक्विन कास्ट्रो यांनी गैर नाटो सहकारी म्हणून पाकिस्तानला आजपर्यंत जो दर्जा मिळाला आहे तो आता रद्द करण्यात यावा, अशी मागणी बायडेन प्रशासनाकडे केली आहे. पाकिस्तानने ज्या पद्धतीने तालिबानला मदत केली त्यावरुन या देशास सहकारी मानणे आता शक्य नाही, असेही या सदस्यांनी म्हटले आहे.

Advertisement

पाकिस्तानने कायमच अफगाणिस्तानच्या विरोधात धोरण घेतले आहे. हक्कानी नेटवर्क बरोबर या देशाचे संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. अफगाणिस्तान मध्ये अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूस सुद्धा पाकिस्तानच जबाबदार आहे, असा आरोप या सदस्यांनी केला आहे.

Advertisement

दरम्यान,  अफगाणिस्तान मध्ये तालिबानी राजवटीत या देशाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. तालिबानला आधीच चीनने आर्थिक मदत जाहीर केली आहे. पाकिस्तानही डाव टाकत आहे. या दोन्ही देशांनी अफगाणिस्तान मध्ये सरळसरळ हस्तक्षेप सुरू केला आहे. त्यामुळे अमेरिकेनेही सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. मानवतेच्या आधारावर अफगाणिस्तानच्या नागरिकांसाठी 6.4 कोटी डॉलर मदत देण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply