Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : पाकिस्तानची आता गुजरातवरही वक्रदृष्टी; पहा नेमके काय म्हटलेय रेडिओ पाकिस्तानच्या अहवालात

दिल्ली : पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संस्था आयएसआय यांनी आता भारताच्या गुजरात राज्यात नवेच डोके लावण्याची तयारी केली आहे. पंजाब आणि काश्मीरमध्ये फुटीरतावाद भडकवल्यानंतर गुजरातच्या जुनागढमध्येही त्याच पद्धतीच्या खेळी करण्याचा डाव या संघटनेने सुरू केल्याचे स्पष्ट झालेले आहे. आयएसआयचे कट्टर आणि जुनागढचे कथित नवाब मोहम्मद जहांगीर खानजी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना काश्मीरप्रमाणे जुनागढचे ‘दूत’ बनण्याचे आवाहन केले आहे. ही बातमी आल्याने जगभरात खळबळ उडाली आहे.

Advertisement

नवाब यांनी इम्रान खान यांना सर्व आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या कब्जापासून जुनागढच्या कथित स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करण्याचे आवाहन केले आहे. म्हणजेच जुनागढ स्वातंत्र्याचा नवा मुद्दा आणण्याची तयारी पाकिस्तानने करण्यास सुरुवात केली असल्याची ही अधिकृतरीत्या बातमी आहे. नवाब मोहम्मद जहांगीर यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की भारत आणि पाकिस्तानने या विषयावर चर्चा करावी आणि चर्चेद्वारे तोडगा काढावा. पाकिस्तान सरकारने जूनागढचा मुद्दा जितका सक्रियपणे काश्मीरचा आवाज उठवत आहेत तितकाच उचलला पाहिजे. तसेच ते सोडवण्यासाठी काम केले पाहिजे.

Advertisement

नवाब म्हणाले आहेत की, ‘जुनागढ हा पाकिस्तानचा भाग पाकिस्तान आहे. ‘जुनागढ पाकिस्तान’ हे केवळ जुनागढ राज्याचे घोषवाक्य नाही, तर ते एक स्वप्न आहे. जे आपले पूर्वज मोहम्मद अली जिना आणि जुनागढचे नवाब असलेले नवाब महाबत खान यांनी पाहिले होते. भारताने जूनागढवरील कथित कब्जाची पाकिस्तानने गंभीर दखल घेण्याची वेळ आली आहे. हा ताबा आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात आहे. यापूर्वी पाकिस्तानने आपला नवा राजकीय नकाशा जारी केला होता. याद्वारे पाकिस्तानने ज्या क्षेत्रांवर भारताशी वाद आहे त्यावर आपला दावा मांडण्याचा प्रयत्न केला होता.

Advertisement

Advertisement

Leave a Reply