Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ मुद्द्यावरून भाजपाने पुकारला एल्गार..उद्यापासून आंदोलन…वाचा नेमकं कारण..

पुढील वर्षी राज्यात महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणूका होणार आहेत. यामागे सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला ओबीसींना आरक्षण न देता निवडणूका घ्यायच्या आहेत,

मुंबई : राज्यात भाजप महाविकास आघाडी सरकारला घेरण्याची एकही संधी सोडत नाही. त्यातच आता नव्या मुद्द्याने राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहेे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपाला टार्गेट केलं आहे. तर भाजपानेही महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलनाची हाक देत एल्गार पुकारला आहे.

Advertisement

महाविकास आघाडी गेल्या सहा महिन्यांपासून आघाडी सरकार ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत टोलवा टोलवी करत आहे. तर इम्पिरिकल डेटाच्या बाबत कायम केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. मात्र भाजपाने महाविकास आघाडीला इम्पिरिकल डेटा गोळा करण्याबाबत कारवाई करण्याविषयी सांगितले होते. मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यात विशेष अशी कोणतीही ठोस भुमिका घेतली नाही. तसेच इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या आयोगाला अद्याप निधीही दिला नाही. तर या हलगर्जीपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ओबीसींना आपलं प्रतिनिधीत्व गमवावं लागणार असल्याची टिका भाजपा आमदार संजय कुटे यांनी केली.

Advertisement

पुढील वर्षी राज्यात महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणूका होणार आहेत. यामागे सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला ओबीसींना आरक्षण न देता निवडणूका घ्यायच्या आहेत, अशी टिका भाजपाने केली आहे. तर आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाविषयी प्रभावीपणे बाजू मांडली नाही. तर धक्कादायक बाब म्हणजे ओबीसी आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने वकीलच उभा केला नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आणि महाविकास आघाडीचे पालक असलेल्या शरद पवार यांनी खुलासा करावा, असे संजय कुटे यांनी म्हटले आहे.

Advertisement

ओबीसी आरक्षणाशिवाय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने विश्वासघात केला असल्याचा आरोप करत भाजपाच्या वतीने उद्या (दि.15 सप्टेंबर) राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या भाजप रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती भाजपाचे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर आणि भाजपा आमदार संजय कुटे यांनी दिली.

Advertisement
Advertisement

Leave a Reply