Take a fresh look at your lifestyle.

अर्र, हे काय भलतेच..! प्रशासनच म्हणतेय कुलर वापरू नका; पहा, नेमका कुठे घडलाय ‘हा’ प्रकार

जबलपूर : देशात कुलरचा वापर वाढला आहे. आज आपल्याला घराघरात कुलर दिसतील. उन्हाळ्यात तर कुलरचे महत्व अनेक पटींनी वाढते. या काळात कुलरला मागणी वाढते. उन्हाळ्यानंतरही कुलरचा वापर होतो. पावसाळ्यातही कुलरचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, हेच कुलर आता मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर शहरात त्रासाचे कारण ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अजून महिनाभर तरी कुलरचा वापर टाळावा, असे आदेश जबलपूर नगर निगमने दिले आहेत. जर कुणाच्या घरात कुलर चालू असल्याचे आढळून आले तर कारवाईचाही इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

मध्य प्रदेश राज्यात सध्या डेंग्यूने थैमान घातले आहे. भोपाळ, इंदौर आणि जबलपूर सारख्या शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. या शहरात डेंग्यूच्या रुग्णांनी शंभरचा आकडा पार केला आहे. त्यामुळे प्रशासनाने जबलपूरमध्ये एक महिन्यासाठी कुलरच्या वापरावर प्रतिबंध टाकले आहेत. या शहरात सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे 177 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे पुढील एक महिन्यापर्यंत शहरात कुलरचा वापर होऊ नये, असे आदेश नगर निगम आयुक्तांनी दिले आहेत. घरांमध्ये वापरण्यात येणाऱ्या कुलर्समध्ये डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. त्यामुळे कुलर्सचा वापर करू नये, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

Advertisement

दरम्यान, मध्य प्रदेश प्रमाणेच उत्तर प्रदेश राज्यात सुद्धा डेंग्यूचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. कोरोना पाठोपाठ पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या आजारांनी नागरिक हैराण झाले आहेत. प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत, तरी देखील रुग्ण मात्र वेगाने वाढत आहेत. या राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र, या नव्या आजारांनी लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा. 

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply