Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तानने केली मोठीच आगळीक; पहा मोदींशी थेट पंगा घेण्यासाठी कोणता मुद्दा उकरलाय आता

दिल्ली : रेडिओ पाकिस्तानच्या अहवालानुसार कथित जुनागड नवाब मोहम्मद जहांगीर यांनी एक निवेदन जारी करून पंतप्रधान इम्रान खान यांना आवाहन केले आहे. भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आणखी एक थेट पंगा घेणारा मुद्दाच त्याद्वारे जगासमोर पुन्हा मांडण्यात आलेला आहे. नवाबांनी म्हटले आहे की भारत आणि पाकिस्तानने जुनागढ या विषयावर चर्चा करावी आणि चर्चेद्वारे तोडगा काढावा.

Advertisement

पुढे जाऊन त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान सरकारने जूनागढचा मुद्दा जितका सक्रियपणे काश्मीरचा आवाज उठवत आहे तितकाच उचलला पाहिजे. तसेच ते सोडवण्यासाठी काम केले पाहिजे. यावर इम्रान खान सरकारने आपली अधिकृतरीत्या प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, जगभरात हा मुद्दा वेगाने पसरत आहे. नवाबाने पुढे म्हटलेय की, ‘जुनागढ है पाकिस्तान का’ हे केवळ जुनागढ राज्याचे घोषवाक्य नाही, तर ते स्वप्न आहे. जे आपले पूर्वज मोहम्मद अली जिना आणि जुनागढचे नवाब असलेले नवाब महाबत खान यांनी पाहिले होते. भारताने जूनागढवरील कथित कब्जाची पाकिस्तानने गंभीर दखल घेण्याची वेळ आली आहे.

Advertisement

नवाब म्हणतात की, जुनागढवरील ताबा हा आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात आहे. यापूर्वी पाकिस्तानने आपला नवा राजकीय नकाशा जारी केला होता. याद्वारे पाकिस्तानने ज्या क्षेत्रांवर भारताशी वाद आहे त्यावर आपला दावा मांडण्याचा प्रयत्न केला होता. या नकाशात पाकिस्तानने खुलेआम काश्मीर, सियाचिनवर दावा केला, पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इम्रान सरकारने केवळ काश्मीरवरच नव्हे तर गुजरातच्या काही भागांवरही आपला दावा केला आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply