Take a fresh look at your lifestyle.

इम्रान खान करताहेत ना’पाक’ गोष्टही; पहा गुजरातच्या कोणत्या मुद्द्यावर गरळ ओकली गेलीय आता

दिल्ली : पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संस्था आयएसआय म्हणजे शेजारी देशांना त्रास देण्यात व्यस्त असलेली डोकेदुखी. आपल्या देशातील वाईट गोष्टींवरील देशाचे लक्ष इतरत्र वेधून राजकीय इस्पित साध्य करणाऱ्या या संघटनेने आता भारताच्या गुजरात राज्यात नवेच डोके लावण्याची तयारी केली आहे.

Advertisement

पंजाब आणि काश्मीरमध्ये फुटीरतावाद भडकवल्यानंतर गुजरातच्या जुनागढमध्येही त्याच पद्धतीच्या खेळी करण्याचा डाव या संघटनेने सुरू केल्याच्या बातम्या येत आहेत. आयएसआयचे कट्टर आणि जुनागढचे कथित नवाब मोहम्मद जहांगीर खानजी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना काश्मीरप्रमाणे जुनागढचे ‘दूत’ बनण्याचे आवाहन केले आहे. नवाब म्हणाले की, इम्रान खान यांनी सर्व आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या कब्जापासून जुनागढच्या कथित स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करावा. म्हणजेच जुनागढ स्वातंत्र्याचा नवा मुद्दा आणण्याची तयारी पाकिस्तानने करण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

रेडिओ पाकिस्तानच्या अहवालानुसार नवाब मोहम्मद जहांगीर यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की भारत आणि पाकिस्तानने या विषयावर चर्चा करावी आणि चर्चेद्वारे तोडगा काढावा. पाकिस्तान सरकारने जूनागढचा मुद्दा जितका सक्रियपणे काश्मीरचा आवाज उठवत आहेत तितकाच उचलला पाहिजे. तसेच ते सोडवण्यासाठी काम केले पाहिजे. एका नकाशात तर जुनागढ हा पाकिस्तानचा भाग असल्याचा दावा करण्यासही पाकिस्तानने मागेपुढे पाहिलेले नाही. एकूनच आता यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच गृहराज्य असलेल्या गुजरातमधून काय प्रतिक्रिया येतात याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply