Take a fresh look at your lifestyle.

अबब..! एकाच कुटूंबातील तब्बल 11 जणांना जलसमाधी…वाचा कोठे घडलीय घटना…

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी बचावकार्याला सुरूवात केली.

अमरावती : घटना घडून गेल्यानंतर सर्वजण त्याबद्दल हळहळ व्यक्त करतात. परंतू अशा घटना घडू नये यासाठी कोणीही जाणीवपुर्वक प्रयत्न करताना दिसत नाही. तसेच हवामानात होत असलेल्या बदलांमुळे अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. तर काही ठिकाणी मानवनिर्मीत आपत्तींमुळे लोकांचा जीव जात आहे. अशीच एका घटनेमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement

सध्या राज्यात पावसाने सर्वदुर हजेरी लावली आहे. तर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी तीव्रतेच्या वादळामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत अनेक लोकांना घेऊन जाणारी बोट अमरावती येथील वर्धा नदी ओलांडत असताना तोल गेल्याने बुडाली. त्या बोटीत बसलेल्या 11 जणांना जलसमाधी मिळाल्याची माहिती समोर येत आहे. तर बोटीवरील सर्वजण एकाच कुटूंबातील होते.

Advertisement

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडेगाव येथील मटरे कुटूंबातील सदस्य दशक्रिया विधी उरकून दहा वाजण्याच्या सुमारास वरूडकडे फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून बोटीने जात होते. मात्र अचानक अनर्थ घडल्याने बोट बुडून मटरे कुटूंबातील 11 सदस्य बुडाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी बचावकार्याला सुरूवात केली. त्यामुळे बचावपथकाने आतापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. ज्यामध्ये एका मुलीचाही सामावेश आहे. तर आणखी आठ जण बेपत्ता आहेत, त्यांचा शोध सुरू आहे.

Advertisement

या घटनेबाबत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करून घटनेतील नागरीकांना श्रध्दांजली वाहिली. तर यात त्यांनी म्हटले आहे की, अमरावती जिल्ह्यातील वर्धा नदीत बोट उलटून एकाच कुटुंबातील 11 जण बुडाल्याची दुर्दैवी व धक्कादायक घटना समोर येत आहेत. यात काही जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली.

Advertisement
Advertisement

Leave a Reply