Take a fresh look at your lifestyle.

सावधान…! त्या जिल्ह्यांना अलर्ट जारी..हवामान खात्याचा इशारा..वाचा कोठे कोसळणार धो-धो पाऊस…

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे कायम आहे. तर गुजरातच्या नालियापासून कमी दाबाचे क्षेत्र खांडवा, बालाघाट, रायपुर संभाळपुर ते बंगालच्या उपसागरातील कमी तीव्रतेच्या वादळापर्यंत सक्रीय आहे.

मुंबई : यंदा पावसासाठी पोषक हवामानामुळे राज्यात सर्वदुर पावसाने हजेरी लावली आहे. तर अनेक ठिकाणी पुरजन्य परिस्थितीही पहायला मिळाली. त्यानंतर पावसाने काही दिवस ओढ दिली होती. मात्र आता राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. तर जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. मात्र आज (दि,14 ) राज्यातील काही जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.

Advertisement

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे कायम आहे. तर गुजरातच्या नालियापासून कमी दाबाचे क्षेत्र खांडवा, बालाघाट, रायपुर संभाळपुर ते बंगालच्या उपसागरातील कमी तीव्रतेच्या वादळापर्यंत सक्रीय आहे. त्यामुळे मान्सुनच्या केंद्राला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडीसा ते बंगालच्या उपसागरातील कमी तीव्रतेच्या वादळापर्यंत कायम आहे.

Advertisement

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून ती ओडीसाच्या किणारपट्टीपर्यंत आली आहे. तर ती सध्या छत्तीसगडच्या दिशेने सरकत आहे. त्याबरोबरच त्याची तीव्रता कमी होत आहे. मात्र गुजरात आणि त्याआजुबाजूच्या परिसरावरही एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय आहे. त्यामुळे राज्यात दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये कोकणात पालघर, मध्यमहाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापुर या जिल्ह्यांचा सामावेश आहे.

Advertisement

तर कोकणातील मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, विदर्भातील अमरावती, अकोला आणि मराठवाड्यातील हिंगोली, जालना आणि परभणी यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र विदर्भात वर्धा, वाशीम, यवतमाळ, नागपुर आणि भंडारा या जिल्ह्यांना विजांसह पावसाचा (एलो अलर्ट Yellow Alert) जारी करण्यात आल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. IMD Alert to Maharashtra.

Advertisement
Advertisement

Leave a Reply