Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. येथेही सरकारला बसलाय जोरदार झटका; अंदाजही ठरलाय खोटा; पहा, नेमके कशात आलेय अपयश

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोना बरोबरच महागाईचे संकट आहे. इंधनाचे दर भरमसाठ वाढले आहेत. या दरवाढीतून दिलासा मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. उलट या दरवाढीमुळेच देशांतर्गत महागाईत वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दर 5.30 टक्के राहिल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता सरकारला आणखी एक झटका बसला आहे. ऑगस्ट महिन्यात ठोक महागाई दर 11.39 टक्के राहिला आहे. या महिन्यात 10.8 टक्क्यांपर्यंत हा दर राहील असा अंदाज होता. याआधी मागील जुलै महिन्यात ठोक महागाई दर 11.16 टक्के होता.

Advertisement

सरकारी आकडेवारीनुसार, इंधन आणि विजेच्या दरात वाढ झाल्यामुळे ठोक महागाईत सुद्धा वाढ झाली आहे. तिमाही दर तिमाहीच्या आधारे ऑगस्ट महिन्यात इंधन आणि विजेच्या महागाईत 26.02 टक्क्यांवरून 26.09 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

Advertisement

ऑगस्टमध्ये, मॅन्युफॅक्चर प्रॉडक्ट्सच्या ठोक महागाई जुलैमध्ये 11.2 टक्क्यांवरून 11.39 टक्क्यांवर वर पोहोचली आहे. मात्र, या काळात खाद्यपदार्थांची महागाई कमी झाली आहे. ऑगस्टमध्ये खाद्यपदार्थांची घाऊक महागाई जुलैमध्ये 4.46 टक्क्यांवरून 3.43 टक्क्यांवर आली आहे. या व्यतिरिक्त, मासिक वस्तूंचा घाऊक महागाई दर ऑगस्टमध्ये 5.72 टक्क्यांवरून 6.20 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

Advertisement

घाऊक महागाईमध्ये कोणताही दिलासा मिळाला नाही, परंतु किरकोळ महागाईच्या आघाडीवर लोकांना थोडा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. किरकोळ महागाईची आकडेवारी ऑगस्टमध्ये जाहीर करण्यात आली. यामध्ये मागील महिन्याच्या तुलनेत काही कमी दिसून आली. सरकारी आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांक आधारित (सीपीआय) किरकोळ महागाई ऑगस्ट 2021 मध्ये 5.30 टक्के होती.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply