Take a fresh look at your lifestyle.

म्हणून सोने आणि चांदीचे भाव होताहेत कमी; पहा, काय आहे नेमके कारण

मुंबई : सोने आणि चांदीचे दर काही दिवसांपासून कमी जास्त होत आहेत. जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत सोने मार्केटवर होत आहे. त्यामुळे आज सुद्धा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज सोन्याचे दर 0.1 टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्यामुळे सध्या सोन्याचे दर 46 हजार 860 रुपये प्रति दहा ग्रॅम असे झाले आहेत. चांदीच्या दरात सुद्धा 0.23 टक्के घट झाली आहे. सध्या एक किलो चांदीचे दर 63 हजार 155 रुपये असे आहेत. जागतिक बाजारात सुद्धा सोन्याचे दर कमी झाले आहेत.

Advertisement

देशात सध्याच्या परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत आहेत. कधी कमी तर कधी जास्त असा ट्रेंड सुरू आहे. यामुळे सोन्याचे दर बरेच कमी झाले आहेत. एक वेळी असे वाटत होते की सोने 50 हजारांच्या पुढे जाईल. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोने 56 हजारांच्याही पुढे गेले होते. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे यावेळी सुद्धा सोने 50 हजरांच्या पुढे जाईल असे वाटत होते. त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला. राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे.

Advertisement

त्यानंतर काही दिवसांपासून सोन्याचे दर पुन्हा कमी जास्त होत आहेत. गुडरिटर्न्स या वेबसाईटनुसार आज मंगळवारी राजधानी दिल्ली शहरात 24 कॅरेट सोन्याचा भाव 50 हजार 340 रुपये असा होता. कोलकाता मध्ये 49 हजार 250 रुपये प्रति दहा ग्रॅम असा आहे. मुंबई शहरात 47 हजार रुपये असा भाव आहे. चेन्नई शहरात 48 हजार 380 रुपये असे नवीन दर आहेत.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply