Take a fresh look at your lifestyle.

म्हणून अमेरिका अफगाणिस्तानला देणार 6.4 कोटी डॉलर; पहा, अमेरिकेने का घेतलाय ‘हा’ निर्णय

वॉशिंग्टन : अफगाणिस्तान मध्ये तालिबानी राजवटीत देशाची अवस्था अतिशय खराब झाली आहे. तालिबानने सरकार गठीत केले असले तरी पैसे नसल्यामुळे देश चालवायचा कसा, असा प्रश्न आहे. तालिबान्यांच्या सध्याच्या कारवायांमुळे जगाने मदतीचे दरवाजे बंद केले आहेत. अशा परिस्थितीत आता अमेरिकेनेच अफगाणिस्तानला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. आधी अमेरिकेने मदत देण्यास नकार दिला होता. आता मात्र, मानवतेच्या आधारावर अफगाणिस्तान मधील नागरिकांसाठी 6 कोटी 40 लाख डॉलर्स आर्थिक मदत देणार असल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे.

Advertisement

अमेरिकेने अफगाणिस्तान मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे आज या देशात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालिबानी राजवटीत येथील नागरिकांचे अत्यंत हाल होत आहेत. तालिबानच्या या कारवायांवर जगानेही मौन साधले आहे. काळजी व्यक्त करण्या पलीकडे फारसे काहीही होत नाही. या देशातील सध्याची परिस्थिती पाहता जागतिक वित्तीय संस्थांनी मदत देण्यास नकार दिला आहे.

Advertisement

या बदललेल्या राजकारणाचा फायदा घेत चीनने अफगाणिस्तानला तब्बल 310 लाख अमेरिकी डॉलर मदत देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर आता परिस्थिती ओळखत अमेरिकनेही अफगाणिस्तानला मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेकडून अफगाणिस्तानला 64 मिलियन म्हणजेच 6 कोटी 40 लाख डॉलर्स पाठवण्यात येणार आहेत.

Advertisement

प्राथमिक स्वरुपात ही मदत आहे. येथील परिस्थिती पाहून आधिक मदत करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेने अद्याप तालिबानी सरकारला मान्यता दिलेली नाही. सध्या तालिबानचा संपूर्ण देशावर कब्जा आहे. त्यामुळे अमेरिकेने ज्या उद्देशाने आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे, तो उद्देश खरेच सफल होणार का, हा मोठा प्रश्न आहे. कारण, तालिबानच्या सध्याच्या कारवाया पाहता असे शक्य होईल, याची शक्यता कमीच आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply