Take a fresh look at your lifestyle.

वाव.. ऑगस्ट महिन्यात राज्यात ‘इतक्या’ युवकांना मिळालाय रोजगार; पहा, काय आहे सरकारचा अहवाल

मुंबई : देशात कोरोनामुळे बेरोजगारीत मोठी वाढ झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात लाखो लोकांना आपले रोजगार गमवावे लागले. त्यामुळे या लोकांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. आता कोरोनाचा प्रसार कमी झाला तसा रोजगार मिळण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. सरकारही यासाठी प्रयत्न करत आहे. राज्यात कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार मिळाला आहे. आताही ऑगस्ट महिन्यात 17 हजार 372 बेरोजगार युवकांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महास्वयम वेबपोर्टल, ऑनलाइन रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतात.

Advertisement

देशात कोरोनाची दुसरी आटोक्यात येत आहे. रुग्णसंख्या वेगाने कमी होत आहे. त्यामुळे राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंधांत सवलती दिल्या आहेत. दैनंदीन व्यवहार सुरू झाले आहेत. उद्योग-कारखाने सुरू होत आहेत. त्यामुळे रोजगारांचे प्रमाण वाढत आहे. राज्यात मागील वर्षात 1 लाख 99 हजार 486 उमेदवारांना रोजगार मिळवून दिले, तर यावर्षात जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान एकूण 1 लाख 11 हजार 83 उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

राज्य सरकारच्या उद्योजकता विभागामार्फत रोजगार मेळावे आयोजित केले जातात. या मेळाव्यांच्या माध्यमातून बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात येतात. विविध खासगी कंपन्या, कॉर्पोरेट कंपन्या यांमध्ये रोजगार मिळवून देण्यात येतात. यावेळी ऑगस्ट महिन्यात मुंबई विभागात 6 हजार 190, नाशिक 2 हजार 168, पुणे 4 हजार 629, औरंगाबाद 3 हजार 738, अमरावती 449 तर नागपूर विभागात 198 इतक्या बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळाले आहेत.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply